*केज शाखा महाराष्ट्र ग्रामीण बॅकेत नियमीत कर्ज फेडणारे शेतकरी सत्कारीत.*
केज (प्रतिनिधी)
जगातला एकमेव व्यक्ती,
ज्याने रक्ताचा एक थेंब सुद्धा न सांडवता,
आपल्या लेखणीच्या बळावर,
सामाजिक, राजनीतिक, धार्मिक,
अशा अनेक प्रकारच्या क्रांती घडवून आणली
अशा महान युगप्रवर्तक क्रांतिकारक, महान अर्थशास्त्रज्ञ,
जगात भारताची मान आदराने उंचावणारे जगातील आदर्श राज्यघटनाकार,भारतरत्न, डॉ बाबासाहेब आंबेडकर
यांच्या १३२ व्या जयंती उत्सवानिमित्त,
महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा केज येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. तसेच नियमित पीक कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्याचा सत्कार करण्यात आला. व सर्व शेतकऱ्यांना आपले पीककर्ज नूतनीकरण करून घावे असे आवाहन करण्यात आले
उपस्थित शाखा व्यवस्थापक जितेंद्र मुराडे,शेतकरी विष्णू थोरात,शिवाजी थोरात शाम थोरात,तात्या शिनगारे,नितीन सरवदे व शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता यावेळी शेतकरी शिवाजी थोरात,विष्णू थोरात, शाम थोरात,परशुराम थोरात यांना सन्मान पत्र देऊन सत्कारीत करण्यात आले नियमितपणे कर्ज वेळेवर आपण परत फेड करत राहावे व इतर शेतकरी बांधव यांनी सुद्धा या शेतकऱ्या प्रमाणे सत्काराला पात्रं ठरावे असे शाखा व्यवस्थापक जितेंद्र मुराडे यांनी उपस्थीत शेतकरी बांधवाना केले.


stay connected