*रामाचा वनवास फक्तं 14वर्ष होता,आमच्या पिढ्यान पिढ्या वनवासाच काय?- डॉ जितीन वंजारे*

 *रामाचा वनवास फक्तं 14वर्ष होता,आमच्या पिढ्यान पिढ्या वनवासाच काय?- डॉ जितीन वंजारे*



       *डॉ बाबासाहेब आंबेडकर नसते तर आमचा पण वनवास होता आम्हालाही वनवासात राहावं लागलं असतं त्या रामा प्रमाणे जंगलात मिळेल ते खाऊन गुजारा करावा लागला असता पण आज जे राजवैभव आहे ते फक्त आणि फक्त त्याच बापाची देणं आहे आणि म्हणून आज महामानव बोधिसत्व क्रांतीसुर्य विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विशेष लेख लिहित आहे*

       आजही आदिवासीं समाज जंगलामध्ये राहतो या पृथ्वीतलावर सगळ्यात आधी वास्तव्य असणारा आदिवासीं समाज हाच या धरातीचा मालक असला पाहिजे पण स्वतःला उच्चभ्रू समजणाऱ्या विकसित मानवाने त्याच अस्तित्व कायम नाकारलं त्याला जंगलात तसाच पडून दिलं आणि आदिवासीं समाज आजही जंगलात धरती मातेवर उदरनिर्वाह करून जगू लागला .पण जगातील एकमेव विद्वान माणसाने म्हणजे विश्वरत्न बोधिसत्व क्रांतीसुर्य डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी भारताची राज्यघटना लिहिताना त्या उपेक्षित घटकाचा अगोदर विचार केला आणि त्याच्या उद्धारासाठी काम केलं.त्यामुळे या भारतातील व्यवस्थेने मला रामाचा चौदा वर्ष वनवास शिकवला पण वर्षानुवर्ष चालत आणि भोगत आलेला आदिवासीं दलीत पीडितांच्या पिढ्यांचा वनवास सांगितला नाही.फक्तं रामाचा वनवास सांगितलं पण राम फक्त वनवासी होता तो फक्त शापित काळ घालवण्यासाठी वनात आला होता पण शबरी ही मुळ जंगलवाशी होती ती वण निवासी होती ती कायम जंगलातील होती ती आदिवासीं होती तिचा वनवास जगाला दिसला नाही .तिचे कष्ट जनिवपूर्वक या समाजाने नाकारले पण महामानवाने आदिवासींचे ,शोषितांचे पीडितांचे दुःख वेशीला टांगून त्यांना न्याय दिला,संविधानात त्यांना योग्य समतापूर्वक वागणूक दिली आणि त्यांना जगण्याचे मार्ग खुले केले.हे फक्त याच महामानवामुळे घडले त्यांचं नाव डॉ भीमराव रामजी आंबेडकर होय.आज त्यांची जयंती आहे म्हणून आम्हाला 'रामा पेक्षा भीमा आवडतो'याच भीमाने आम्हाला माणूस असून माणसाचे अधिकार हिसकवणाऱ्या मनुचे दहन करून  माणसाला मानुसपण दिले .आजची पत प्रतिष्ठा दिली याच महामानवामुळे आम्ही पशुसम माणसात आलो .मोठे झालो.नावारूपाला आलो.

                मी शालेय जीवनापासून भीम सैनिक असून शिव शाहू फुले आंबेडकरी विचारांना समजून आहे .मला तुम्ही नास्तिक म्हटलं तरी चालेल पण रामा भीमाच्या कल्पक कथा मझ्या मनावर रुजत नाहीत कारण मी विज्ञानवादी बुद्ध वचालाय मी शाहू फुले आंबेडकर वाचलेत मी छत्रपती वाचलेत आणि म्हणून मला रामाच्या चौदा वर्ष वनवासाच काहीच वाटत नाही कारण आमच्या पिढ्यान् पिढ्या ह्याच वनवासात राहिलेल्या आहेत आणि आजही खेद वाटतो की आमचे आदिवासी अजूनही जंगली आहेत वनवासी आहेत देशाला स्वातंत्र्य मिळून ७५वर्ष पलटली तरी आजही पारतंत्र्यात गुलामगिरीत खितपत पडलेला समाज पाहून, येथील दलितांवरील अत्याचार अन्याय पाहून, येथील आदिवासीं वरील अन्याय अत्याचार पाहून इतकं वाईट वाटत की खरोखर भारताला मिळालेल्या स्वातंत्र्यावर आक्षेप घ्यावासा वाटतो की नक्की स्वतंत्र कोणाला मिळालं आहे .कारण मागास जाती अजूनही तशाच आहेत .आदिवासीं अजूनही जंगलात आहेत आणि जेही परिवर्तन झालं आहे ते फक्त आणि फक्त त्या महामानव क्रांतीसुर्य बोधिसत्व विश्वरत्न डॉ बाबसाहेब अंबेडकर यांच्याचमुळे आहे हे विसरायला नको आणि म्हणून मी म्हणतो रामाचा वनवास फक्त चौदा वर्ष असेल पण माझ्या दलीत शोषित पीडित आदिवासी समाजाचा वनवास हा कायमचा होता, शतकानुशतकेचा होता आणि तो संविधानाने कमी करणारा बाप म्हणजे भीमराव रामजी आंबेडकर होय.आज त्याच महान  महामानवाची जयंती आहे असं एकही क्षेत्र नाही की ज्याचा अभ्यास या प्रज्ञासुर्याने केला नाही .कायद्याने न्याय दिला संविधानाने समता बंधुत्व द्याय स्वतंत्र दिलं,महिलांना समान हक्क दिले,मागासवर्गीयांना आरक्षण दिले, स्री ला शिक्षणं दिलं,गरोदर पणाला पेड लिव्ह दिली, कामाचे आठ तास निश्चित केले,कामगार बील आणून कामगारांना आठवड्याची सुट्टी दिली,त्यांना आरोग्य तपासणी,आहार, ओव्हर टाईम,कामाचा योग्य मोबदला दिला,देशाला संविधान दिलं,महिलांना महिला कोड बिल दिलं,धर्माचा प्रचार प्रसार करण्याची मुभा दिली, व्यक्ती स्वतंत्र दिलं,कोणावरही बोलण्याचा टीका करण्याचा आंदोलन,उपोषण,निषेध करण्याचा अधिकार दिला,आपल मत मांडण्याचां अधिकार दिला ,अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिला,अन्यायाविरोधात आवाज उठवन्याचा प्रतिकार करण्याचा अधिकार दिला,संपत्तीत समान अधिकार दिला,आपली भाषा,संस्कृती, रूढी परंपरा जपण्याचा अधिकार दिला, स्वच्छंद जगण्याचा अधिकार दिला,शेतकऱ्यांना शेती कासण्याचा ,शेतीचे शासकीयकरण करून समसमान देश संपत्ती वाटप करण्याचा कायदा केला पण मनुवादी लोकांनी तो मान्य केला नाही,अस्पर्शाना अधिकार देऊन गावकुसा बाहेरील अस्पर्श माणसात आणले,त्याच्यावरील अत्याचार अन्याय दूर व्हावा म्हणून घटनेत तशी तरतूद केली,येथील हजारो जातींचा अभ्यास करून जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतणी भागीदारी या युक्तीने मूल्यांकन केले आणि आरक्षण दिले,प्रत्येक जाती धर्मातील लोकांना संविधानात गुंफून ठेवलं,जगाला युद्धाची नाही तर बुद्धाची गरज आहे  आणि फक्त बुद्धच विज्ञानवादी आहे हे पटवून दिले त्याच धर्मात प्रवेश करून हिंदू धर्मातील जाचक अटींमुळे पिढ्यान् पिढ्या ची गुलामगिरी बाजूला सारली,नदी जोड प्रकल्पाची आखणी केली जी आजही अस्तित्वात आणली नाही,शेती ,सिंचन,वीज,शिक्षण, सुरक्षा, प्रशासन,शासन,न्याय व्यवस्था,हक्क आणि कर्तव्य याची ज्याला त्याला जाणीव करून दिली. अस्पर्षा मंदिर प्रवेश,पानी पिण्यासाठी केलेला संग्राम, महार रेजिमेंट ची स्थापना,भीमा कोरेगाव ची शौर्य गाथा,हे त्यांची ठळक कामे.महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर एवढ्यावरच थांबले नाहीत त्यांनी अर्थशास्त्रात पिएचडी करून  त्यांनी लिहिलेल्या द प्रॉब्लेम ऑफ रुपी या ग्रंथामुळे भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली ,सहकार क्षेत्राचाही प्रचंड अभ्यास असणारा त्या काळाचा एकमेव कोहिनूर  हिरा म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर होय.त्यांनी लिहिलेल्या द इंनहीलेशन ऑफ कास्ट, द प्रॉब्लेम ऑफ रुपी, अन् टचेबल, बहिष्कृत भारत, हू वाज शुद्राज, अशी एकूण बावीस पुर्ण लिहून झालेले ग्रंथ,दहा अपूर्ण ग्रंथ, दहा निवेदने,साक्षीपुरावे,दहा शोध निबंध,लेख,परीक्षणे इत्यादी साहित्याचा महामेरू अभ्यासक तत्वज्ञानी,संशोधक,प्रज्ञासूर्य,क्रांतीसुर्य, अभ्यासक,विस्लेशक,लेखक,वक्ता,नेता,अशी अनेक विशेषण तंतोतंत लागू होणारा हा महा मानव होता त्यांच्या साहित्याने भारतात मोठी क्रांती केली आणि ही सर्व क्रांती पेनाच्या टोकावर होती तलवारीच्या धाकावर नव्हे किंव्हा रक्तरंजित नव्हे तर शंतीच्या मार्गाने होती.त्यांनी चालू केलेली मासिके,साप्ताहिक, दैनिक लोकांच्या मनातील भीती दूर करून त्यांना क्रांतीच्या प्रवाहात आणून मोठ जन आंदोलने त्यांनी उभी केली त्यात प्रबुद्ध भारत,मूकनायक,समता,जनता, बहिस्कृत भारत अशी अनेक वृत्तपत्र चालू केली आणि समाज प्रबोधन केले.आणि म्हणूनच इतकं सारं योगदान असणाऱ्या सूर्या समान तेज आणि ज्ञाना चा अथांग सागर असणाऱ्या डॉ भीमराव रामजी आंबेडकर म्हणजेच तुमचा आमचा बाप डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना आधुनिक भारताचे जनक म्हटले जाते.आणि त्यामुळेच त्यांची जयंती अख्या जगात साजरी होते तो एकमेव वर्गाबाहेर बसून शिक्षण घेणारा जगाचा सर्वात विद्वान विद्यार्थी होता ,मोठ मोठ्या  विद्यापीठात त्यांची फोटो,पुतळे लावलेले आहेत,अश्या या भारताच्या कोहिनूर हिऱ्याला जयंती निमित्त विनम्र अभिवादन.आणि त्यांच्या कार्याला सलाम.शेवटी एकच म्हणतो "जब तक सूरज चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा" जय भीम जय भारत....!

*लेखन-भीमसैनिक डॉ. जितीनदादा वंजारे खालापूरीकर सम्पर्क -९९२२५४१०३०*








टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.