बायको झोपेत असतानाच केला खून ------------------- आष्टी शहरातील फुले नगर येथील घटना आरोपी पतीला पोलिसांनी केले अटक

 बायको झोपेत असतानाच केला खून
-------------------
आष्टी शहरातील फुले नगर येथील घटना
आरोपी पतीला पोलिसांनी केले अटक



आष्टी/ प्रतिनिधी

झोपेत असलेल्या पत्नीच्या डोक्यात सिमेंट बाॅल्क मारून पतीने खून केल्याची घटना आज पहाटेच्या सुमारास आष्टी शहरातील फुलेनगर येथे घडली आहे.निलम संभाजी वाल्हेकर वय(३२)वर्ष असे मयत पत्नीचे नाव आहे.आरोपी पती संभाजी वाल्हेकर याला अटक करण्यात आली आहे.







आष्टी येथील फुलेनगर येथे राहत असलेल्या संभाजी वाल्हेकर हे पत्नीसह नेहमीप्रमाणे जेवण करून गुरूवारी रात्री अंगणात झोपले होते.शुक्रवारी पहाटे तीनच्या सुमारास पत्नी झोपेत असताना दारूचे व्यसन असलेल्या पतीने तिच्या डोक्यात सिमेंट बाॅल्क मारून खून केल्याची घटना घडली.या प्रकरणी आरोपीचा भाऊ दौलत वाल्हेकर यांच्या फिर्यादीवरून आष्टी पोलिस ठाण्यात आरोपी पती संभाजी शिवाजी वाल्हेकर वय वर्ष ३८ रा.फुलेनगर आष्टी याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी आष्टीचे उपअधीक्षक अभिजीत धाराशिवकर,पोलीस निरीक्षक हेमंत कदम,सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय देशमुख,पोलिस उपनिरीक्षक प्रमोद काळे यांनी भेट दिली. आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विजय देशमुख करीत आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.