बाबासाहेबांच्या घटनेमुळेच अल्पसंख्यांक सुरक्षित: अंजुम इनामदार
पुणे- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीजच्या वतीने स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पन करुन अभिवादन करण्यात आले.
सदर प्रसंगी मनोगत व्यक्त करताना अंजुन इनामदार यांनी सांगितले की, "डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून दिलेल्या हक्क, अधिकार व संरक्षणामुळेच देशातील अल्पसंख्यांक सुरक्षित असून, देशाच्या विकासात आपले योगदान देत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांन प्रती अल्पसंख्यांक समुदाय कामयच कृतज्ञाता व्यक्त करीत राहील".
सदर प्रसंगी नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीजचे अध्यक्ष राहुल डंबाळे, प्रशांत उर्फ लुकस केदारी व इतर मान्यवर उपस्थित होते.





stay connected