खासदार सनी देओल ‘बेपत्ता’
पंजाबमधील पठाणकोटचे खासदार सनी देओल ‘बेपत्ता’ झाले आहेत. कारण पठाणकोटमध्ये ते बेपत्ता झाल्याचे पोस्टर्स तरुणांनी बसस्थानक आणि रेल्वे स्थानकावर लावले आहेत. यासोबतच सनी देओल खासदार झाल्यानंतर आजपर्यंत पठाणकोटमध्ये आले नसल्याचे सांगत त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. जिल्हा सहसचिवांसह आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हे पोस्टर लावले आहेत. यावेळी ते म्हणाले की, गुरुदासपूर आणि पठाणकोट लोकसभा मतदारसंघात जी विकासकामे खासदाराकडून करायची होती, ती आजपर्यंत होऊ शकली नाहीत. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.त्यामुळे ते बेपत्ता खासदाराचे पोस्टर लावत आहेत. दुसरीकडे, लोकसभा मतदारसंघातील तरुणांचे म्हणणे आहे की, सनी देओल जेव्हापासून खासदार झाले आहेत तेव्हापासून पठाणकोटला आले नाहीत आणि गुरुदासपूरमध्येही दिसले नाहीत.
stay connected