भाजप नेत्या पंकजाताईंनी केले सलीम जहाँगीर यांचे अभिष्टचिंतन
वाढदिवसानिमित्त राज्यभरातुन शुभेच्छांचा वर्षाव
बीड ( प्रतिनिधी ) भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी भाजप नेते सलीम जहाँगीर यांचा सत्कार करून त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. तर बीड जिल्ह्याच्या दबंग खासदार डॉ. प्रितमताई मुंडे यांनीही सलीम जहाँगीर यांना फोनवरुन शुभेच्छा दिल्या. पंकजाताई , प्रितमताईंसह राज्यभरातील पदाधिकारी ,कार्यकर्ते, विविध संघटनांकडून तसेच सामान्य नागरिकांनीही सलीम जहाँगीर यांच्यावर प्रत्यक्ष भेटून , फोनवरून शुभेच्छांचा वर्षाव केला.
बीड जिल्हा भाजप नेते तथा भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सलीम जहाँगीर यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी प्रत्यक्ष सलीम जहाँगीर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत पुढील राजकीय वाटचालीस आशिर्वाद दिला. त्याचबरोबर खा. प्रितमताई मुंडे, भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष हाजी एजाज देशमुख , आ. सुरेशआणा धस ,युवा नेते अक्षय मुंदडा, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, ऍड. सर्जेरावतात्या तांदळे , प्रा.देविदास नागरगोजे , संतोष हांगे, आदींनी सलीम जहाँगीर यांना वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या. राज्यभरातील भाजप पदाधिकारी , कार्यकर्ते , विविध संघटन , सदस्य आणि सामान्य नागरिकांनीही सलीम जहाँगीर यांना शुभेच्छा दिल्या.
stay connected