*हा महाराष्ट्र भूषण नव्हे हा तर महाराष्ट्र कलंक- डॉ जितीन वंजारे*
*लेखन राजकीय अभ्यासक-मा.सम्राट डॉ.जीतीनदादा वंजारे खालापूरीकर संपर्क-९९२२५४१०३०*
*1)अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी पुरस्कार वापस करावा आलेली मदत मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या कुटंबियाना द्या,कारण हा मोठा अपघात असून ११ जणांना प्राण गमवावे लागले आहेत*
*२)आयोजकांनी कार्यकर्ते उन्हात तळत ठेवले आणि पण्यावाचून मेले त्या आयोजकांवर ३०२ ची गुन्हे दाखल करा*
*३)तुमच्या राजकीय स्वार्थासाठी पैसे देऊन लोक आणून स्वतःची शान वाढवणाऱ्या उपस्थित नेत्यावरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा*
*४)पुरस्काराच्या कार्यक्रमात नेमकी इतका खर्च करून इतकी गर्दी करून राजकीय फायदा उठवणाऱ्या बेजबदार नेत्यांवर कठोर कार्यवाही करा*
*५)महाराष्ट्र भूषण हा विशिष्ट समाजाचा मक्तेदारी चा विषय आहे की काय ? कारण आजपर्यंत फक्त ब्राह्मण समाजालाच तो देण्याचं पातक येथील राजकर्त्यानी केलं आहे*
एखादी राजकीय सभा असावी अशा पद्धतीची प्रचंड गर्दी जमवून देशाचे गृहमंत्री अमित शहा,महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे,महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बीजेपीचे ज्येष्ठ नेते बावनकुळे या सर्वांच्या उपस्थितीमध्ये अफाट गर्दीमध्ये पार पडलेला महाराष्ट्र भूषण सोहळा हा महाराष्ट्र भूषण नसून महाराष्ट्र कलंक सोहळा ठरला आहे कारण त्या ठिकाणी अकरा श्री सेवकाचा मृत्यू झालेला आहे महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्र बाहेरील आलेल्या नेत्यांना बसायला मोठमोठे फॅन लावलेल् शेड निर्माण केलं होतं परंतु सोहळ्यासाठी आलेल्या श्री सेवकांना साधा मंडपही नव्हता मग आयोजकांनी शासकीय तिजोरीतून प्रचंड प्रमाणात पैसा खर्च करून आनलेल्या श्री सेवकांची गैरसोय का केली ? त्यांना जिथे आहेत तिथे पाणीपुरवठा का नाही केला ? उष्माघाताने प्रचंड प्रमाणात घशाला कोरड पडले असताना त्या श्री सेवकांना वेळीच पाणी न मिळाल्यामुळे त्यांचा डीहायड्रेशन मुळे मृत्यू झाला उष्माघाताच्या एकूण उन्हाळ्यात महाराष्ट्रात होणाऱ्या मृत्यूच्या आकड्या एवढा एकाच कार्यक्रमात सामान्य लोकांचा मृत्यू होणं आणि ते पण समाजसेवा करणाऱ्या ज्येष्ठ समाजसेवक आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या महाराष्ट्र भूषण सोहळ्यामध्ये ही महाराष्ट्र धर्माला काळीमा फासणारी गोष्ट आहे.त्यामुळे मी सामाजिक कार्यकर्ता माननीय सम्राट डॉक्टर जितीनदादा वंजारे खालापुरीकर आवाहन करतो की तो सोहळा आयोजित करणारे शासन प्रशासन अधिकारी राष्ट्रीय तसेच महाराष्ट्रातील नेते यांनी स्वतःच्या पदाचा राजीनामा द्यावा आणि तो पुरस्कार स्वीकारणाऱ्या आप्पासाहेब धर्माधिकारी यांनीही तो पुरस्कार वापस देऊन त्या पुरस्काराची आलेली मदत ती पण मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना सुपूर्द करावी कारण समाजसेवेसारख्या प्रतिष्ठेच्या क्षेत्रातील पुरस्कार घेत असताना अकरा श्री सेवकाचा मृत्यू होणे ही महाराष्ट्राला काळीमा फासणारी गोष्ट आहे ती घडलीच कशी? चुकीला माफी नाही संबंधित आयोजकांवर गंभीर गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत. श्री सेवकांचा मृत्यू केवळ आणि केवळ तुमच्या ढिसाळपणामुळे आणि निष्काळजीपणामुळे झाल आहे त्यामुळे त्या 11 श्री सेवकांच्या मृत्यूची जबाबदारी घेऊन स्वतःच्या पदाचे राजीनामे देऊन पुरस्कार वापसी केली पाहिजे. याच महाराष्ट्रामध्ये एखाद्या आरोपीला फाशीची शिक्षा झाली तरी पुरस्कार वापस देणारे आज 11 श्री सेवकांचा मृत्यू झाला तरी पुरस्कार स्वीकारूच शकतात कसे त्यामुळे ही घटना अगदी निंदनीय असून शासन प्रशासन याला सर्वस्वी जबाबदार आहे शासनाने जरी मदत जाहीर केली असली तरी ही घटनाच होऊ नये यासाठी तुम्ही काय खबरदाऱ्या घेतल्या होत्या याची सीबीआयचे चौकशी झाली पाहिजे आणि अशा पद्धतीचे सोहळे मोठमोठ्या सभा मोठ्या बाबा, बुआ, अम्मा, महाराजांची कीर्तने प्रवचने दरबारे ज्यामुळे येथील रोडची ट्रॅफिक वाढते, लोकांना ध्वनी प्रदूषणाचा सामना करावा, लागतो तेथील हवा प्रदूषित होते त्या गर्दीमुळे सूक्ष्मजीव जंतूंचा प्रसार प्रचार होतो त्यामुळे संबंधित परिसरात रोगराई,आजार,अस्वच्छता, गंदगी पसरते हे या सर्वांमुळे पर्यावरणाची हानी होते तेथील लोकांना ट्रॅफिकचा मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागतो हे सगळं येथील नेत्यांच्या राजकीय स्वार्थापोटी लोकांना नाहक त्रास सहन करावा लागतो यावर विशिष्ट कायदा निर्माण झाला पाहिजे आणि पर्यावरणाचा ऱ्हास टाळण्यासाठी ज्यांना ज्यांना मोठमोठी सोहळे सभा किंवा कीर्तने प्रवचने दरबारे घ्यायची आहेत त्यांनी अगोदर वृक्षारोपण केलं पाहिजे ते त्यांना बंधनकारक असले पाहिजे जसं एखाद्या क्षेत्रामध्ये एमआयडीसी स्थापन करायचे असेल तर त्याच्या 30 टक्के जमीन ही वृक्ष लागवडीसाठी वापरावी लागते वृक्षारोपण करावे लागते जेणेकरून पर्यावरणाचा समतोल राखता येईल कारखान्यांमुळे जे प्रदूषण होतं ते प्रदूषण राखता येईल या दृष्टिकोनातून त्याचा आयोजन केलेलं असतं त्याच पद्धतीने या सोहळ्यामुळे सभांमुळे जो पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे त्याची पेनल्टी पण याच राजकीय नेत्यांकडून वसूल व्हावी असे स्पष्ट मत डॉक्टर जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार आज पर्यंत काही विशिष्ट समाजाच्या लोकांनाच का दिला गेला यावरही महाराष्ट्रामध्ये चिंतन मंथन व्हायला पाहिजे कारण काही विशिष्ट जातीचीच या पुरस्कारावर मक्तेदारी आहे की काय असा प्रश्न आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून विचारला जात आहे धर्मवादी जातीयवादी मनोवादी विचारसरणीतून अशा पद्धतीची मानाच्या पुरस्काराची देवाण-घेवाण होत असेल तर हे कृत्य अनैसर्गिक असून हा महाराष्ट्रावर एक प्रकारचा अन्याय येत आहे आज पर्यंतच्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराची लिस्ट पाहिली असता त्यात फक्त आणि फक्त ब्राह्मणी व्यक्तीचा समावेश आहे त्यांना सोडून इतर कोणत्याच जातीच्या लोकांचा उल्लेख नाही नेमका हा योगायोग आहे की जाणून बुजून या व्यवस्थेवर केलेला अन्याय आहे हे पण पाहणं गरजेचं आहे कारण महाराष्ट्रामध्ये प्रखर सामाजिक कार्य करणारे किंवा इतर क्षेत्रात अनन्य साधारण महत्त्व प्राप्त असलेले अनेक लोक आहेत परंतु त्यांना सहजपणे बेदखल करून काही विशिष्ट जातीच्या लोकांनाच हा पुरस्कार का दिला जातो हा कारणमीमांसेचा विषय आहे.


stay connected