*डॉ. आंबेडकर जयंती निमित्त निकाळजे पिता-पुत्राचे अवयव दान!**------------------------**ऍड.वाल्मिक तात्या निकाळजे व ऍड.प्रबोधन निकाळजे यांचे मरणोत्तर अवयव दान!*
*आष्टी (प्रतिनिधी):*
सध्याच्या मानवी जीवनात माणसाचे विविध अवयव निकामी होत आहेत त्यामुळे माणसाला जीव गमवावा लागत असून अवयवा अभावी लाखो लोक मृत्यूमुखी पडत आहेत. म्हणून अवयवदानाचे महत्त्व जाणून अवयव दान हेच जीवनदान! समजून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्त भारतीय जनता पार्टीचे अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा राज्याचे ज्येष्ठ मानव अधिकार कार्यकर्ते ऍड. वाल्मीक तात्या निकाळजे व त्यांचे पुत्र ऍड.प्रबोधन वाल्मीक निकाळजे या पितापुत्राने 14 एप्रिल रोजी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून मरणोत्तर अवयव दान केले आहे! या निकाळजे पिता पुत्रांनी 14 एप्रिल रोजी अवयवदानाची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली आहे! फुले -शाहू -आंबेडकरी चळवळीतील व अनुसूचित जाती, आदिवासी, भटके विमुक्त चळवळीतील जास्तीतजास्त लोकांनी न भिता मरणोत्तर जीवंत राहण्यासाठी आणि मेल्या नंतर देखील गरजूंच्या कामी येण्यासाठी मरणोत्तर अवयव दान करावे असे विनम्र आवाहन सर्व समाजास केले! त्यांच्या समाज उपयोगी उदात्त कृत्याबद्दल आणि धाडसी निर्णया बद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे!
धाराशिव लातूर बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाचे विधान परिषद सदस्य माजी मंत्री आमदार सुरेश धस, शिक्षण महर्षी मा. आमदार भीमराव धोंडे, अखिल भारतीय अधिवक्ता परिषदेचे संघटन प्रमुख ऍड.बाबुराव अनारसे, समाजसेवक विजय गोल्हार, ज्येष्ठ पत्रकार अनंतराव हंबर्डे सर, प्रफुल्ल सहस्रबुद्धे, उपसंपादक उत्तम बोडखे, माजी शिक्षण सभापती नियामत बेग, आष्टी नागरी पतसंस्थेचे चेअरमन डॉ. विलास सोनवणे,मच्छिन्द्रनाथ मल्टीस्टेट बँक चेअरमन नामदेव भाऊ राऊत, नगराध्यक्ष रंगनाथ अण्णा धोंडे, नगरसेवक झिया बेग, नगरसेवक सुरेश वारंगुळे, ग्रामीण रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. राहूल टेकाडे, आरपीआय चे तालुकाध्यक्ष अशोक साळवे, अरुण भय्या निकाळजे, नोटरी महाराष्ट्र सरकार ऍड. आर. टी. जगताप, भाजपा नेते ऍड. साहेबराव म्हस्के, ऍड. ताहेर जमाल, ऍड. अविनाश निंबाळकर,नोटरी भारत सरकार ऍड.रत्नदीप निकाळजे, नोटरी भारत सरकार ऍड. सतीशकुमार गायकवाड यांचेसह आष्टी तालुका वकील संघ, प्रसिद्ध नाट्य कलावंत रुपेश निकाळजे, माजी नगरसेवक दीपक दादा निकाळजे, शासकीय कंत्राटदार राजू निकाळजे, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव समितीचे सर्व पदाधिकारी, इत्यादीनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून असा धाडसी निर्णय जास्तीतजास्त लोकांनी करावा असे आवाहन केले आहे!
अवयव दानाची सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी स्वंयसेवक आकाश ढवळे व त्यांच्या संपूर्ण टीम ने प्रचंड सहकार्य केले.


stay connected