गारपीटग्रस्तांना एकरी एक लाख रूपये द्या.- शेख अजिमोद्दीन
बीड जिल्ह्यात काल वादळीवाऱ्यासह गारपीट झाली .त्यात रब्बी गहू, ज्वारी, हरबरा,कांदा , फळबागा यांचे मोठ्याप्रमाणात नूकसआन झाले . वीज पडून बैल,गायी शेळी कोंबडी व शेतकरी यांचा म्रूत्यू देखील झाले .अगोदरच शेतीमालाला निर्यात बंदीमूळे बाजारात किंमत मिळत नाही.बाजार समितीमध्ये आधारभूत किंमत मिळत नाही.अटीशर्तीमध्ये कांदा अनूदान शेतकऱ्यांना मिळणार नाही शेतकर्यांचा कांदा बाजारसमीती मध्ये पंचवीस पैसे किलो विकला गेला त्याची ही बाजार समिती मध्ये प्रतिक्विंटल एक किलो वजन कपात बेकायदा करण्यात आली तसेच बाजार समिती मध्ये कांदा गोणीची रक्कम परत दिली जात नाही. बॅक, पतसंस्था, फायनान्स कंपन्या मार्च एंड नावाखाली सक्तीची वसूली करत आहेत. शेतकरी सर्वच बाजूंनी मेटाकुटीला येऊन शेतकरी आत्महत्यांमधे बीड जिल्ह्याचा महाराष्ट्रात पहिला नंबर आहे .
बीड जिल्ह्यातील गारपीट ग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट आपत्ती निवारण कायद्यानूसार शासनाने एकरी एक लाख रुपये तातडीने द्यावेत . असे बीड जिल्हा शेतकरी संघटना यांनी या प्रसिध्दी पत्रकाद्वारे मागणी केली आहे. जिल्हाधिकारी यांनी पंचनामे ,निकष या सर्व बाबी दूर ठेवून आपत्ती व्यवस्थापनाचे अध्यक्ष या नात्याने तात्काळ शासनाकडे पाठपुरावा करून ही मदत द्यावी असे बीड जिल्हा शेतकरी संघटनेचे शेख अजिमोद्दीन,रामेश्वर गाडे,अशोक हातवटे, रहेमान सय्यद,निलाराम टोळे, मच्छिंद्र जगताप ,अनूरथ काशीद,राधाकिसन गडदे बाळासाहेब गुंड,आदी पदाधिकारी यांनी ही मागणी केली आहे.
stay connected