अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आ.आजबेनी केली पाहणी तात्काळ पंचनामे करून शासनाने मदत जाहीर करावी : आ.बाळासाहेब आजबे

 अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आ.आजबेनी केली पाहणी 
तात्काळ पंचनामे करून शासनाने मदत जाहीर करावी  : आ.बाळासाहेब आजबे



आष्टी( प्रतिनिधी)

आष्टी तालुक्यातील कडा ,धामणगाव, शेरी बु।।,केरुळ या गावात शनिवारी झालेल्या अवकाळी पावसाने  शेतकऱ्यांच्या पिकांचे  मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

 आ. बाळासाहेब आजबे यांनी अधिकाऱ्यांना बरोबर घेत नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करत तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.

शनिवारचा दिवस हा आष्टी तालुक्यासाठी अक्षरशा काळा दिवस ठरला. पोटच्या लेकराप्रमाणे सांभाळलेले पिके व फळबागा दुपारी अचानक आलेल्या अवकाळी वादळी पावसाने भुईसपाट झाल्या. रब्बी हंगामातील कांदा मका गहू हरभरा या पिकांची अगदी काही सेकंदात राख रांगोळी झाली. हीच शेतकऱ्याची दयनीय अवस्था पाहण्यासाठी रविवारी सकाळीच आमदार बाळासाहेब आजबे शेतकऱ्यांच्या बांधावर जात त्यांचे अश्रू पुसले व शेतकऱ्यांना धीर देत तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. आष्टी तालुक्यातील शेरी,केरुळ या गावांमध्ये फळबागा मोठ्या प्रमाणावर आहेत या ठिकाणी द्राक्ष ,लिंबू,डाळींब आणि संत्रांची झाडे अक्षरशः उपटून पडले आहेत तर कडा परिसरामध्ये गहू मका आणि हरभऱ्याचे अतोनात नुकसान झाले आहे प्रशासनाने तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना आमदार बाळासाहेब आजबे यांनी दिल्या तसेच जास्तीत जास्त नुकसान भरपाई शासनाकडून मिळण्यासाठी आपण शासन दरबारी प्रयत्न करणार असल्याचेही यावेळी आमदार बाळासाहेब आजबे यांनी शेतकऱ्यांशी बोलताना सांगितले ,यावेळी त्यांच्या समवेत आष्टी तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे मंडळ कृषी अधिकारी शिदोरे साहेब राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव नाकाडे बाळासाहेब पिसाळ राम गोंदकर बाळासाहेब महाडिक डॉक्टर संतोष काकडे संतोष झिंजुके फिटर काळू झिंजुके धनु शिंदे गोटूराम महाजन सरपंच एकनाथ सारूक उद्धव भोसले बाबासाहेब गर्जे एकनाथ शिंदे अशोक गर्जे कैलास गर्जे अनारसे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




आष्टी तालुक्यातील सुरुडी येथे काल झालेल्या अवकाळी पावसामध्ये वीज अंगावर पडून महादेव किसन गर्जे या शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला,  आ.बाळासाहेब आजबे यांनी सुरुडी येथे जाऊन मयत कुटुंबाची भेट घेत सांत्वन केले व  त्यांच्या कुटुंबियांना तात्काळ शासनाची मदत देण्यात यावी असे अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.




आष्टी तालुक्यातील केरूळ येथे मधुकर अनारसे यांच्याकडे सात वर्षापासून पाच एकर द्राक्षाची बाग आहे. सध्या द्राक्ष तोडणीचा हंगाम सुरू झाला असून काल शनिवारी आलेल्या अवकाळी पावसाने सर्व द्राक्षे गड गळून पडले आहेत.वर्षभर मेहनत करून , मोठा खर्च करून डोळ्यादेखत असे पीक वायाला जाताना शेतकऱ्याचे डोळ्यात अश्रू आले होते या ठिकाणी आमदार आजबे यांनी भेट देऊन शेतकऱ्यांना धीर दिला.








टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.