*केज तालुक्यात विजांच्या कडकडाटासह वादळी वारे,आणि गारांचा जोरदार पाऊस!* *अवकाळी पावसाचा कहर; गारांचा पडला खच, कांद्यासह रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान!* *पावसाने झोडपून ६ पशुधनाचा मृत्यू! नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्या--आ.नमिता मुंदडा*

 *केज तालुक्यात विजांच्या कडकडाटासह वादळी वारे,आणि गारांचा जोरदार पाऊस!*
*अवकाळी पावसाचा कहर; गारांचा पडला खच, कांद्यासह रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान!*
*पावसाने झोडपून ६ पशुधनाचा मृत्यू! नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्या--आ.नमिता मुंदडा*



==============================================

केज (प्रतिनिधी)

केज तालुक्यात दुसऱ्यांदा अवकाळीने कहर केला असून काल झालेल्या वादळी वाऱ्यासह आणि गारांचा जोरदार पाऊस झाल्याने शेतावर कामासाठी गेलेल्या शेतकरी आणि शेतमजुरांची दैना ऊडाली.तर गारपिठीसह झालेल्या पावसात झोडपून ६पशुधनाचा मृत्यू झाला आहे तसेच या पावसामुळे शेतात काढुन टाकलेल्या कांदा फळपिके आंबा आणि रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.


 याबाबत अधिक माहिती अशी की केज तालुक्यातील नांदूरघाट,ऊत्तरेश्वर पिंप्री, केज,होळ,युसुफ वडगांव, आडस,विडा,आदि महसुल मंडळात दि.८ एप्रिल शणिवार रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले  असुन काल दुपारी २:०० वाजता अचानक झालेल्या पावसाने हाहाःकार उडाला असुन जोरदार वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह गारांचा  जोरदार पाऊस झाला. या पावसात केज तालुक्यातील अनेक गावात गारपिटीने आणि पावसामुळे झोडपून ६ पशुधन मृत पावले असून यामध्ये १) श्री. जयराम तुकाराम हांगे राहणार हांगेवाडी यांचे एक बैल व एक गाय २) श्री.नारायण मुंडे राहणार देवगाव यांचा एक बैल,३) श्री. शशिकांत संपतराव हांगे राहणार हांगेवाडी यांचा एक बैल,४) श्री.अण्णासाहेब दत्तू मुळीक राहणार मांगवडगाव यांची एक गाय,५) श्री. लक्ष्मण बाबासाहेब आंधळे राहाणार रामेश्वरवाडी यांची एक शेळी यांचा समावेश आहे तर या पावसात मृत्युमुखी पडलेल्या पशुधनाचे तात्काळ पंचनामे करून सदरील शेतकऱ्याला तात्काळ नुकसान भरपाई म्हणून आर्थिक मदत करावी. अशी मागणी केज मतदारसंघाच्या आमदार. नमिता मुंदडा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेसह जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांचे कडे केली आहे. हा पाउस कमी जास्त प्रमाणात रात्री उशिरापर्यंत सुरु होता. या अचानक आलेल्या पावसामुळे शेतावर कामाला गेलेले शेतकरी आणि शेतमजूर झोडपले, तर शेतात काढून टाकलेले कांदा पिक पुर्णपणे वाया गेला असुन यासह ज्वारी,गहू  पिकांची बऱ्याच ठिकाणी कापणी केलेली असल्याने आणि या पावसाचे शेतातून पाणी वाहून गेल्याने  हे पिक खराब झाले आहे.तसेच टरबुज,खरबुज,आबा आदी पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.या अगोदरही काही दिवसांपूर्वी केज तालुक्यात असाच अवकाळी पाऊस झाला होता. आणि आताही त्यापेक्षाही जोरदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास या अवकाळीने हिरावुन घेतला आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात चिंता व्यक्त करण्यात येत आहे. काल झालेला पाऊस केज तालुक्यातील सर्वच महसूल मंडळात झाला असुन हा पाऊस एवढा मोठा होता. की या पावसाबरोबर जोरदार वारे आणि विजांचा कडकडाट होता.तर गारांचा खच पडलेला अनेक ठिकाणी पहावयास मिळाला.या झालेल्या पावसामुळे शेतातून पाणी बाहेर पडुन नदिला पाणी आले आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या रब्बी पिकांचे आणि कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्याने या नुकसानीचे शासनाने तात्काळ  पंचनामे करुन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी. अशी मागणी शेतकरी वर्गातुनही करण्यात येत आहे.







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.