Latur News: स्वयंपूर्ण तरुण हाच देशाचा आधार आणि हाच आमचा निर्धार! 2023

Latur News: स्वयंपूर्ण तरुण हाच देशाचा आधार आणि हाच आमचा निर्धार! 2023






बाबूराव बोरोळे
तालुका प्रतिनिधी निलंगा


कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत घेण्यात येत असलेल्या ‘पं. दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्या’चे आज आयटीआय, निलंगा येथे उद्घाटन केले. उपस्थित काही तरुणांना जॉबकार्डचे वाटप करून त्याच्याशी संवाद साधला व पुढील भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.  


लातूरचा तरुण हा सुशिक्षित तसेच होतकरू आहे. येथील तरुणांनी आपल्या बुद्धिमत्तेची चुणूक ही वेळोवेळी जगाला दाखवली आहे. परंतु त्यांना भेडसावणारा बेरोजगारीचा प्रश्न सोडविण्याकरिता हा मेळावा आयोजित करण्यात आल्याचे मत यावेळी व्यक्त केले. तसेच आजच्या या मेळाव्याच्या माध्यमातून तब्बल २ हजार जणांना थेट रोजगार देण्यात येणार असून यामुळे अनेक सुशिक्षित आणि बेरोजगार तरुणांच्या जीवनात नवीन रंग भरले जातील, असा विश्वास ही व्यक्त केला.


 यावेळी भाजपा प्रदेश सचिव अरविंदजी पाटील निलंगेकर, विभागीय उपजिल्हाधिकारी शोभाताई जाधव, तहसीलदार अनुपजी पाटील, पोलीस उपअधीक्षक दिनेशजी कोल्हे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मिलिंदजी लातूरे, खादी ग्रामोद्योगचे चेअरमन दगडूजी सोळुंके, शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख सुधीरजी पाटील, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष शेषेरावजी मंमाळे, वसंतजी पालवे, तास्मियाताई शेख यांच्यासह असंख्य नागरिक व तरुण-तरुणी उपस्थित होते.








Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.