राष्ट्रवादीचे बजरंग सोनवणे यांची कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रचारात जोरदार मुंसडी
केज (प्रतिनिधी)
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या त्रिशंकु निवडणुकीत रनधुमाळी जोरदार सुरु आहे. गावपातळीवर भेटी गाटीचा तथा बैठकांचा वेग वाढलेला आहे.
या बाबत सविस्तर वृत असे कि केज कृषी उत्पन्न समितीचे मतदान (दि.२८) एप्रिल रोजी होत असून या निवडणुकीच्या प्रचाराने जोर धरला आहे. राष्ट्रवादी कॉंगेस नेते धनजंय मुंडे यांच्या नेतृत्वाने बजरंग सोनवणे संपूर्ण ताकतीनिशी सोबत महाविकास आघाडीच्या सुशिलाताई मोराळे, नंदकुमार मोराळे , भैय्यासाहेब पाटील , रत्नाकर शिंदे , भाई मोहन गुंड , माजी सभापती बालासाहेब जाधव आदि दिग्गजांना सोबत घेऊन बळीराजा परिवर्तन पॅलनच्या माध्यमातून तालुक्यातील प्रत्येक मतदारांना भेटत आहेत. त्यांच्याशी संवाद साधुन समस्या समजून घेत आहेत. मतदारराजा देखील हेरीरिने त्यांच्या सोबत खांद्याला खांदा लावुन प्रचार करत असल्यामुळे तसेच केज तालुक्यातील मोठ्या प्रमाणात सेवा सोसायटी ,ग्रामपंचायतवर बजरंग सोनवणे यांचे वर्चस्व असल्यामुळे त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समीतीच्या निवडणूकीच्या प्रचारात जोरदार मुसंडी घेतल्याचे चित्र केज तालुक्यातील जनतेला पाहावयास मिळत आहे.
त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते बजरंग सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली बळीराजा परिवर्तन पॅनलचे सर्व उमेदवार विजयी होऊन परिवर्तन होणार अशीच चर्चा सध्या पंचक्रोशीत सर्वत्र होऊ लागली आहे.
stay connected