फुलेनगर येथे भीम जन्मोत्सवानिमित्त अठरा तास वाचन करून महामानवास मानवंदना ; जयंती उत्सव कमिटीचा स्तुत्य उपक्रम, अठरा तास वाचनास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

 फुलेनगर येथे भीम जन्मोत्सवानिमित्त अठरा तास वाचन करून महामानवास मानवंदना ; जयंती उत्सव कमिटीचा स्तुत्य उपक्रम,
अठरा तास वाचनास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.



केज/प्रतिनिधी


केज शहरातील महात्मा फुले नगर,आंबेडकर नगर,हाऊसिंग कॉलनी भागातील सुयश कोचिंग क्लासेस येथे भीम जन्मोत्सवानिमित्त अठरा तास वाचन करून महामानवास अनोखी मानवंदना जयंती उत्सव कमिटीचा स्तुत्य उपक्रम असुन अठरा तास वाचनास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून या कार्यक्रमाचे स्वागत सर्व स्तरातून होत आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की,दिनांक ९ एप्रिल २०२३ रोजी रवीवारी भीम जन्मोत्सव कमिटीचे अध्यक्ष विवेक बनसोड तर सचिव तात्या गवळी जयंती उत्सव कमिटीचे मार्गदर्शक तथा नगरसेवक सुमेध बप्पा शिंदे व या कार्यक्रमाचे आयोजक एल.एफ.सी, मिलिंदसागर युवाप्रतिष्ठान यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

अठरा तास वाचनास सकाळी ठीक ६-०० वाजता सुयश कोचिंग क्लासेस येथे सुरुवात करण्यात आली.यामध्ये फुलेनगर येथील ४० लहान विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवून समाज बांधवापुढे एक आदर्श दाखवून दिला आहे या विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे ‌सचिन ज्वेलर्सचे संस्थापक सचिन विवेक पाठक यांनी अठरा तास वाचनास बसलेल्या विद्यार्थ्यांना सकाळी नाश्ता,चहा व दोन वेळेचे जेवणाची व्यवस्था केली आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष भागवत सोनवणे सर तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे केज नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सौ.सिताताई बनसोड,विठ्ठल आव्हाड सर, उत्तरेश्वर जाधव सर, रंजीत वाघमारे सर,ज्येष्ठ पत्रकार श्रावणकुमार जाधव,अविनाश घुले सर, स्वाभिमानी पत्रकारसंघाचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, आदर्श पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक सोनवणे, मराठी पत्रकार परिषदेचे विजय आरकडे,ज्येष्ठ पत्रकार धनंजय कुलकर्णी,पत्रकार वसंत सोनवणे,जयंती उत्सव कमिटीचे मार्गदर्शक नगरसेवक सुमित बप्पा शिंदे सचिन ज्वेलर्सचे संस्थापक सचिन वेदपाठक यांची प्रमुख उपस्थिती होती.

मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज,तथागत गौतम बुद्ध,महात्मा ज्योतिबा फुले,राजर्षी  छत्रपती शाहू महाराज, परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ईत्यादी महामानवांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून धूप दिपानी पूजा करून वंदन करण्यात आले.यावेळी उपस्थित मान्यवरांचा जयंती कमिटीच्या वतीने पुष्पगुच्छ व भारतीय संविधानाची प्रस्तावना फोटो फ्रेम देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी आव्हाड सर, घुले सर, वाघमारे सर,जाधव सर यांनी आपले मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांचे कौतुक करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यावर मार्गदर्शन केले.शिका संघटित व्हा आणी संघर्ष करा हा मुलमंत्र विद्यार्थ्यांना सांगून पुढील दिशा विद्यार्थ्यांनी कशी जपायची ?यावर मोलाचे मार्गदर्शन केले.

यावेळी केज नगरपंचायत च्या नगराध्यक्षा सौ. सिताताई बनसोड यांनी उपस्थित त्यांना मुलाचे मार्गदर्शन केले पुढे बोलताना नगराध्यक्षा सौ. सिताताई बनसोड म्हणाल्या की,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आधी वाचून साजरी करून महा मानवास अनोखी मान वंदना देऊन महामानवाचे विचार प्रत्यक्षात आणून विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करून मोठे होऊन डॉक्टर,इंजिनियर, कलेक्टर यासारखे अधिकारी म्हणून आपले स्वतःचे करिअर घडवावे आपले नावलौकिक आपणच करावे त्याचबरोबर आपण वाचाल तर वाचाल शिकाल तर टिकाल नाही तर आपण भंगारमध्ये विकाल असे सौ.सीताताई बनसोड यांनी म्हटले आहे.यावेळी जयंती उत्सव कमिटीचे अध्यक्ष विवेक बनसोड तर सचिव तात्या गवळी,कोषाध्यक्ष अशोक धीवार,लहूजाधव, पप्पू मामा कसबे,माजी सैनिक,ज्येष्ठ नागरिक भागवत शिरसाट,प्रेम मस्के,ओम शिनगारे, संदेश ताकतोडे,अक्षय जगताप,अंश शिरसट, ग्रामसेवक विनोद शिरसट, अनिकेत गालफाडे,पवन बनसोड,राहुल इनकर, सुहास समुद्रे,अनुप खंडाळे,सुरज वैरागे, पियुष जानवे यांच्यासह एल.एफ.सी ग्रुप आणी मिलिंद सागर युवा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते वाचक विद्यार्थी,नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रस्ताविक अशोक गायकवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन सचिव तात्या गवळी यांनी केले.








टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.