कवी अनिल केंगार यांना छत्रपती संभाजीनगर येथे महाराष्ट्र दर्पण आयकॉन पुरस्काराने सन्मानित
सांगोला तालुक्यातील वाढेगाव गावचे सुपुत्र व लय भारी साहित्य समूहाचे संस्थापक अध्यक्ष मा.अनिल केंगार यांना साहित्यिक सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक अशा क्षेत्रात कार्यरत राहून समाजमन आणि जाणीव समृद्ध करण्यास हातभार लावून आपल्या कार्यातून समाजाला प्रेरणा दिल्या.त्याबद्दल महाराष्ट्र साहित्य दर्पण यांच्यावतीने ज्येष्ठ साहित्यिक बापमाणूस मा.चंद्रकांतदादा वानखेडे, ज्येष्ठ साहित्यिका डॉ.नयनचंद्र सरस्वते (माई ) महाराष्ट्र साहित्य दर्पणचे मुख्य संपादक मा.कवी /लेखक / गीतकार गुलाबराजा फुलमाळी, यांच्या हस्ते सपत्नीक यांना महाराष्ट्र दर्पण आयकॉन पुरस्कार २०२३ देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी लयभारी साहित्य समूहाचे सचिव खंडु भोसले ही उपस्थित होते.
तसेच बाप प्रातिनिधीक कविता संग्रह मध्ये मायबाप ही कविता छापली असून बाप प्रातिनिधीक कविता संग्रहाचे प्रकाशन सोहळा महाराष्ट्र साहित्य दर्पण आयोजित महाराष्ट्र दर्पण साहित्य संमेलन २०२३ सोहळा संपन्न.
लय भारी साहित्य समूहाच्या माध्यमातून संमेलन घेऊन व संपूर्ण महाराष्ट्रातील नवोदित कवींना आपल्या हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले तसेच सांगोला तालुक्यामध्ये प्रथमच लय भारी साहित्य समूहाची सुरुवात करून २२ मे २०२२ मध्ये १३० कवी / कवयित्री यांच्या उपस्थितीमध्ये पहिले राज्यस्तरीय कवी संमेलन घेऊन राज्यभरातून येणाऱ्या कवी व कवयित्री यांना सन्मानित करण्यात आले. तसेच दुसरे राज्यस्तरीय कवी संमेलन हे गोरेगाव मुंबई येथे घेण्यात आले. तिसरे कवी संमेलन हे कांदिवली मुंबई येथे घेण्यात आले. हे सर्व कवी संमेलन उपस्थित कवी व कवयित्री यांना विनाशुल्क प्रवेश देऊन घेण्यात आली होती. याचीच महाराष्ट्र साहित्य दर्पण चे मुख्य संपादक मा.कवी / लेखक / गीतकार गुलाबराजा फुलमाळी तसेच ज्येष्ठ साहित्यिका मा.डॉ. नयनचंद्र सरस्वते ( माई )मा. सुनिता गोविंद कपाळे यांनी दखल घेऊन अनिल केंगार यांना महाराष्ट्र दर्पण आयकॉन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
stay connected