*फुलेनगर येथे भीम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न* *श्री आदर्श बहुउद्देशीय सेवाभावी संस्थे मार्फत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप*, भीम जयंती प्रथम वाचून नंतर नाचून साजरी.

 *फुलेनगर येथे भीम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न* 
*श्री आदर्श बहुउद्देशीय सेवाभावी संस्थे मार्फत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप*,
भीम जयंती प्रथम वाचून नंतर नाचून साजरी.



केज /प्रतिनिधी


केज शहरातील महात्मा फुले नगर,आंबेडकर नगर हाउसिंग कॉलनी भागात  परमपूज्य बोधिसत्व महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त दिनांक ९ एप्रिल ते १४ एप्रिल पर्यंत सलग सहा दिवस दोन सत्रामध्ये विविध उपक्रम घेऊन प्रथम वाचून नंतर नाचून मोठ्या उत्साहाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली.श्री आदर्श बहुउद्देशीय सामाजिक संस्था व सम्यकक्रांती सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. दि.९ रोजी प्रथम अठरा तास ४० विद्यार्थ्यांनी वाचन करून महामानवास अभिवादन करण्यात आले.दि.१० एप्रिल रोजी सकाळी रक्तदानशिबिराचे आयोजन करून मोठ्या प्रमाणात युवकांनी रक्तदान केले व रक्तदान शिबिरास मोठा प्रतिसाद मिळाला.रात्री सातवाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीचे अनावरण मोठ्या दिमाखात केले व महाराष्ट्राचा नावलौकिक शाहीर शितलताई साठे आणि शाहीर सचिन भाऊ माळी यांचा शाहिरीजलसा मोठ्या उत्साहात पार पडला.दि.११ एप्रिल रोजी सकाळी सामान्यज्ञान, हस्ताक्षर स्पर्धा घेऊन रात्री प्राचार्य कमलाकर कांबळे सर यांचे बाबासाहेबांचे तीन गुरु या समाज प्रबोधन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

दि.१२ रोजी सकाळी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या संकल्पने तून निबंध स्पर्धा,वकृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. रात्री लहान व मोठ्या गटातील विद्यार्थ्यांची नृत्य स्पर्धा या नृत्य स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला.

दि.१३ एप्रिल रोजी सकाळी रांगोळी स्पर्धा उत्कृष्ट प्रकारे पार पडली. त्याचबरोबर रात्री महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक झी युवा संगीत सम्राट फेम व काळजावर कोरले नाव आमच्याभीमा कोरेगाव फेम महागायक अजय देहाडे प्रस्तुत "तुफानातील दिवे" या लाईव्ह कॉन्सर्ट या सुंदर कार्यक्रमाचा आस्वाद  फुलेनगर येथील नागरिकां सह केज शहरातील व तालुक्यातील तसेच  कळंब,अंबाजोगाई,किल्ले  धारूर तालुक्यातील नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून या कार्यक्रमाचा आनंद घेतला.दि.१४ रोजी सकाळी सर्वप्रथम ध्वजारोहण करून वंदना घेऊन महामानवाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून धूप दिपानी पूजन करून वंदन करण्यात आले व सर्व स्पर्धेतील विजेत्यांचे बक्षीस वितरण व विविध क्षेत्रांमध्ये नावलौकिक केलेलेमान्यवर,अधिकारी, केज तालुक्यातील  सरपंच,ग्रामपंचायत सदस्य यांचा याप्रसंगी सन्मान करण्यात आला. त्याच बरोबर बुद्धश्रेष्ठीच्या निर्मित्या मा.उपासिका त्रिवेणीताई कसबे यांना यावर्षीचा मानाचा मिलिंद युवा सागर पुरस्कार प्रदान करण्यात आला.

सायंकाळी ठीक सहा वाजता जयंती मिरवणूकी स सुरुवात करण्यात आली.संपूर्ण भीम जन्मोत्सव शांततेत पार पडल्याबद्दल सर्वांनी सहकार्य केल्याबद्दल महात्मा फुले नगर,आंबेडकर नगर हाउसिंग कॉलनी येथील सर्व नागरिकांचे आणी जनविकास परिवर्तन आघाडीचे प्रमुख हारूनभाई इनामदार, केज नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सौ.सिताताई बनसोड,नगरसेविका सौ. पद्मिनी अक्का शिंदे यांच्यासह विविधक्षेत्रातील मान्यवराचे व देणगीदारांचे प्रत्यक्षात अप्रत्यक्षत सहकार्य करणाऱ्यांचे जयंती उत्सव कमिटीचे मार्गदर्शक सुमित बप्पा शिंदे,अध्यक्ष विवेक बनसोड,सचिव तात्या गवळी कोषाध्यक्ष अशोक 

धिवार आणी एल.एफ.सी ग्रुप,मिलिंद युवा सागर प्रतिष्ठानचे कार्यकर्ते यांनी आभार मानले आहेत.












टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.