भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 वी जयंती साजरी


भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 वी जयंती  साजरी



आज दिनांक 17.04.2023 रोजी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीचा कार्यक्रम विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालय सोलापूर येथे करण्यात आला. या कार्यक्रमात विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री नीरज कुमार दोहारे, अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री शैलेंद्र सिंह परिहार व सर्व शाखा अधिकाऱ्यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले, पश्चात सामुदायिक बुद्धवंदना करण्यात आली. एस एसी/ एसटी असोसिएशनचे अध्यक्ष श्री सचिन बनसोडे, ओबीसी असोसिएशनचे अध्यक्ष श्री टी ए लोहार, एनआरएमयू चे प्रतिनिधी श्री प्रिती धवणे आणि सीआरएमएस चे प्रतिनिधी श्री रोहन माने यांनी बाबासाहेबांच्या कार्याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. श्री नीरज कुमार दोहारे  यांनी बाबासाहेबांच्या विचारांचा व त्यांच्या शिकवणीचा आपण आपल्या दैनंदिन जीवनात अवलंब करावा असे संबोधन केले. कार्यक्रमात वरिष्ठ विभागीय कार्मिक अधिकारी श्री जी पी भगत,  वरिष्ठ विभागीय इंजिनियर समन्वय श्री चंद्रभूषण, वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक श्री एल. के. रणयेवले व सर्व शाखाधिकारी मान्यताप्राप्त युनियन व असोसिएशनचे पदाधिकारी आणि विभागीय कार्यालय मध्ये कार्यरत सर्व कर्मचारी बहुसंख्य संख्येने उपस्थित होते. विभागीय कार्मिक अधिकारी श्री एस. एल खोत यांनी बाबासाहेबांच्या कार्याला उजाळा देत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या कार्यक्रम यशस्वी करण्यात श्री सचिन बनसोडे, मुख्य कामगार कल्याण निरिक्षक, श्री अजय सांवत, मुख्य कामगार कल्याण निरिक्षक, श्री विनोद केंगार मुख्य कामगार कल्याण निरिक्षक, इत्यादिचा  सहभाग होता.

-----






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.