वरीष्ठ पोलीस निरीक्षक ( सीआयडी ) गोरखभाऊ शेळके सेवानिवृत्त
आष्टी तालुक्यातील धानोरा गावचे भूषण असलेले आदरणीय व एक आदर्श व्यक्तिमत्त्व आपले पाय जमिनीवर कायम घट्ट ठेवणारे वरीष्ठ पोलीस निरीक्षक आदरणीय गोरख (भाऊ) शेळके साहेब हे ३७ वर्ष आपली पोलीस सेवा बजावल्या नंतर आज सेवानिवृत्त झाले त्यांची कारकिर्द खूप संघर्षमय आणि बरीच मोठी अशी होती
गावी आल्यावर सतत गोरगरीब सर्वसामान्य मित्रांच्या सहवासात ते राहत असतात . आपल्या पदाचा कधीही मोठेपणा न मिरवता ते गावातील प्रत्येकाशी प्रेमाणे बोलतात . आस्थेवाईकपणे सर्वांची चौकषी करतात . गावातील यात्रा असो किंवा कोणताही सार्वजनिक उत्सव असो त्यात गोरख भाऊ हिरीरीने सहभागी होतात . लेझीम खेळण्यात साहेबांना विशेष रस असतो . अशा या शांत सुस्वभावी प्रेमळ व्यक्तीमत्वाच्या गोरख भाऊंना सेवानिवृत्ती प्रसंगी धानोरा ग्रामस्थ व मित्रपरिवाराकडून खुप खुप शुभेच्छा .
वयाच्या १९ व्या वर्षी ते पोलीस सेवेत रुजू झाले व आपल्या चांगल्या कामगिरी मुळे त्यांनी वरीष्ठ पोलीस निरीक्षक पर्यंत पद भूषविले,सध्या ते क्रिमिनल इन्वेस्टीगेशन डिपार्टमेंट(सी.आय.डी) पुणे येथे कार्यरत होते तसेच काल डॉ.दिलीप पाटिल भुजबळ(आय.पी.एस-इन्स्पेक्टर जनरल सी.आय.डी) यांच्या हस्ते सी.आय.डी ऑफिस पुणे येथे जाहीर कार्यक्रम घेऊन त्यांचा जाहीर सन्मान करुन त्यांचा निरोप संभारंभ पार पडला,साहेबांनी आपल्या ३७ वर्षी पोलीस सेवेत आपल्या प्रामाणिक व उत्तम कामगिरी मुळे ३०+ मेडल्स व अवार्ड्स आपल्या नावी केले अश्याच आमचे आदरणीय गोरख (भाऊ) शेळके साहेबांना सेवानिवृतीच्या च्या व भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छ💐💐
stay connected