शिदेवाडी येथे जलजीवन मिशन योजनेतून ७० लक्ष रुपये कामाचे भूमिपूजन संपन्न
*******************************
********************************
आष्टी (प्रतिनिधी)
आमदार सुरेश धस यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील सर्वात मोठी असलेल्या मुर्शदपुर- कासारी- शिदेवाडी ग्रामपंचायतच्या माध्यमातून शिदेवाडी येथे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत ७० लक्ष रुपयांच्या कामाचे तसेच ३० लक्ष रुपयांचे विविध विकास कामांचे भूमिपूजन माजी जिल्हा परिषद सदस्य खंडू दादा जाधव, सरपंचपती अशोक मुळे,उपसरपंच जालिंदर वांढरे,सचिन लोखंडे,कपिल अग्रवाल यांच्यासह आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
आष्टी तालुक्यातील मुर्शदपुर-कासारी- शिदेवाडी या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आमदार सुरेश धस यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विकासकामे प्राधान्याने केले जात असून यामध्ये शिदेवाडी येथे अनेक वर्षापासून भिडसावणारा पाणी प्रश्न आता मार्गी लागणारा असून याचे भूमिपूजन शुक्रवार दि.३१ मार्च रोजी मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. तसेच शिंदेवाडी येथे ३० लक्ष रुपये खर्चून हनुमान मंदिर पेव्हींग ब्लॉक बसवणे,वामनभाऊ मंदिर
पेव्हींग ब्लॉक बसवणे,वारंगुळेवस्ती हनुमान मंदिर येथे पेव्हींग ब्लॉक बसवणे हे कामे प्रगतीपथावर आहेत.आगामी काळात जलजीवन योजनेच्या माध्यमातून गावातील पाणी प्रश्न मार्गी लागणार असल्याने आमदार सुरेश धस यांचे ग्रामस्थांच्यावतीने आभार मानत समाधान व्यक्त केले आहे.या भूमिपूजन समारंभ प्रसंगी मधुकर लोखंडे,मनोज धनवडे,सचिन काकडे, दिलीप वारंगुळे, कृष्णा वारंगुळे,संदीप वारंगुळे,नितीन वारंगुळे,प्रविण वारंगुळे,परमेश्वर वारंगुळे,मारुती वारंगुळे,सुभाष वारंगुळे,नितीन दरेकर,संजय दरेकर,अंकूश केरुळकर,संतोष खंडागळे,मल्हारी खंडागळे,एकनाथ खंडागळे,
भागवत गिरी,बापू केरुळकर,अण्णा केरुळकर, इंजि.परमेश्वर काकडे,सतिष खंडागळे,नामदेव केरुळकर,मुक्ताराम केरुळकर,विठ्ठल वाल्हेकर, कुंडलिक खंडागळे,पांडुरंग खंडागळे,अशोक काकडे,संजय केरुळकर, राजू ससाणे,भानुदास
वारंगुळे,अक्षय पवार,सुनील दरेकर आदींसह शिदेवाडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
stay connected