Breaking News: मोबाईलवर व्हिडीओ पाहताना ८ वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू

Breaking News: मोबाईलवर व्हिडीओ पाहताना ८ वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू  


केरळमधील तिरुविल्वामला येथे एका आठ वर्षांच्या मुलीचा फोनची बॅटरी फुटल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ती खूप वेळ मोबाईलवर व्हिडीओ पाहता होती. पोलिसांनी मंगळवारी ही माहिती दिली.


सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास आदित्यश्री फोनवर व्हिडीओ पाहत असताना अचानक मोबाईलचा स्फोट झाला. मोबाईल फोन मुलीच्या चेहऱ्याजवळ होता. स्फोट झाल्यामुळे तिच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली आहे. आदित्यश्री आठ वर्षांची आणि तिसरी इयत्तेत शिकणारी विद्यार्थिनी होती. हा मोबाईल तीन वर्षांपूर्वी खरेदी करण्यात आला होता. गेल्या वर्षी फोनची बॅटरीही बदलण्यात आली होती. घटनेच्या वेळी आदित्यश्री आणि तिची आजी एकटी घरी होती






.

मुलीच्या चेहऱ्यावर गंभीर जखमा झाल्या. तिच्या उजव्या हाताची बोटे तुटली आणि तळहातही पूर्णपणे भाजला होता, असे पोलिसांनी सांगितले

 फेब्रुवारीमध्ये मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये मोबाईलचा स्फोट झाल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. एक 68 वर्षीय व्यक्ती घरात मृतावस्थेत आढळून आली होती. त्यांचा चेहरा आणि शरीराच्या इतर वरच्या भागांना गंभीर इजा झाली होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.