*असद,अतीक, अश्रफ फक्त मर्डर मिस्ट्री यांना दडवयाची आहे पुलवामा हिस्ट्री- डॉ जितीन वंजारे*

 *असद,अतीक, अश्रफ फक्त मर्डर मिस्ट्री यांना दडवयाची आहे पुलवामा हिस्ट्री- डॉ जितीन वंजारे*



 बीड प्रतिनिधी/- भारत हा लोकशाही प्रधान देश आहे, भारतामध्ये लोकशाही चालते भारतामध्ये हुकूमशाहीला ना थारा होता, ना आहे,ना असणार आहे परंतु काही धर्मवादी सत्ता भारतामध्ये रूढ झाल्यापासून भारतामध्ये घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीला धार्मिक, जातीय,पंथवादी, प्रांतवादी वातावरण निर्माण होत आहे हे कुठेतरी थांबणे गरजेचे आहे आणि हे थांबवण्यासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतातील नॅशनल मीडिया हा स्वतंत्र असला पाहिजे,सध्या नॅशनल मीडिया सत्ताधाऱ्याची गुलामी करताना सर्रासपणे दिसतो आहे,उघड्या डोळ्याने या संविधानवादी देशांमध्ये "बुटचाटी मीडिया" पाहून मनामध्ये ग्रहणास्पद भावना निर्माण होत आहे परंतु याकडे येथील जनता, राजकीय नेते,विरोधी सरकार तोंडात मूग गिळून गप्प आहे. 'क्योंकी सबने चोरी के लड्डू खाये हैं'असच पाहायला मिळत आहे .देशात कुठलेही बील पास करताना येथील मीडिया जनतेचे ध्यान भटकवण्यासाठी  काँट्रोवर्सी निर्माण करतो आहे ,माईंड डायव्हर्ट करण्याचं काम करतो आहे आणि भारतातील निरर्थक गोष्टींना अनन्य साधारण महत्त्व दिलं जातंय ही वस्तूस्थिती आज नॅशनल मीडियाची आहे .सुशांत राजपूत मर्डर केस,शाहरुख खान च्या मुलाचं ड्रग प्रकरण,कंगना राणावत प्रकरण, आत्ताच अतिक, अश्रफ मर्डर केस अशी हाय होलटेज प्रकरण समोर आणून त्यामागून कायदे पारीत करणं, नवे  कायदे आमालात आणण,सरकारचे झुटी कारनामे झाकण हे सर्रासपने चालू आहे आणि याला साथ येथील काही गोदी मीडिया देत आहे ही लोकशाहीला मारक गोष्ट आहे यावर वेळीच सन्माननीय सुप्रीम कोर्टाने दखल घेण्याची गरज आहे नसता प्रत्येक गोष्टीला धार्मिक,प्रांतिक,पांथिक,जातीय रंग देऊन देशातला शांतता आणि अखंडता, कायदा आणि सुव्यवस्था खंडित होईल आणि त्याचे दूरगामी परिणाम या देशाला भोगावे लागतील.

                 चालू सरकारच्या काळामध्ये जनतेच्या हितासाठी असणाऱ्या गोष्टी मागच्या दहा वर्षांमध्ये  काही नॅशनल मीडियावर एकदाही बोलल्या गेल्या नाहीत. येथील वाढती महागाई, शिक्षणाचे बाजारीकरण, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, शेतीमालाचे हमीभाव, बेरोजगारी,धर्मवाद सरकार,जातीय दंगली, दलीत अत्याचार,बलात्कार प्रकरणे,कर्ज बुडून पळून गेलेले उद्योगपती,बुडलेल्या बँका,इत्यादी प्रश्नावर एकदाही सरकारला प्रश्न विचारले नाहीत परंतु धर्मवाद, हाय होल्टेज ड्रामा असणारऱ्या निरर्थक गोष्टी, मोदीची वाहवा करणाऱ्या गोष्टी जास्त बोलल्या गेल्या.आणि म्हणून येथील जनतेने या बूटचाट्या भूमिका असणाऱ्या मीडियाला समर्थक 'गोदी मीडिया' अस नाव दिलं आहे.आजचे प्रकरण तुम्ही टिव्ही वर पहिलेच असेल त्यात सकाळपासून रात्रीपर्यंत फक्त अतीक,अश्रफ,असद मर्डर मिस्ट्री च्याच बातम्या दुसरं काहीच नाही आणि मुळ विषय म्हणजे भारत देशासाठी सीमेवर लढणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या सैनिक असणाऱ्या  बहुजनांची गरिबांची चाळीस पोरं तीनशे किलोच्या स्पोटकानी भरलेल्या स्कॉर्पिओ गाडीने  आत्मघातकी पणाने मारली,चिंधड्या उडवल्या  हे प्रकरण तेथील तत्कालीन राज्यपाल सत्यपाल मलीक यांनी सत्य घटना बाहेर काढली त्यावेळी छप्पन इंचाची छाती डीस्कव्हरी वरच्या जंगलातील मालिकेत जंगलात कठीण परिस्थितीत जगायचं कसं याच प्रशिक्षण घेत होते.अरे आमच्या त्या जवानाचे काय ?त्यांच्या मृत्यूचे आजही आरोपी का सापडत नाहीत ? त्यांचा मुह साठी पाच सैनिकी हेलिकॉप्टर मोदींनी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी का नाकारली ,अजित डोहाळ याने त्याचा निवडणुकीत फायदा होईल असे का म्हटले ,मोदींनी तत्काळ अँक्शन का घेतली नाही ? जवणाना मारण्यासाठी आणलेले तीनशे किलो आर डी एक्स आल कुठून ? येथे गोव्यावरून महाराष्ट्रात येताना सीमा पार करताना हजार वेळा गाडी चेक होते आणि त्यात चुकून एखादी दारूची बॉटल गाडीत राहिली तर पोलीस फाईन मरतात लगेच काढून घेतात मग साधी दारू ची छोटी बॉटल आणता येत नाही तिथे  दिवसा ढवळ्या इतके तीनशे किलो स्पोटके भारतात इतर देशातून येतातच कशी? भारतातील यंत्रणा त्यावेळी कुचकामी ठरतात कश्या?जेल मधुन आरोपी पोलिसांच्या हतात असताना, मीडियाला बोलताना, इतकं तगडं पोलीस प्रोटेक्शन असताना गोळ्या घालून आरोपीला मरतात कसे? आतीक अहमद हत्या कांडात पोलीस असताना गोळीबार होतो कसा ?त्याच्याकडे पाकिस्तान कनेक्शन उघडं झाल्यावर मोठ मोठे मासे गळाला लागतील याच भीतीने त्याला मारलं गेलं की काय ? त्याची न्यायालयीन चौकशी ,आरोपी प्रक्रिया पूर्ण होऊ दिली नाही त्यात त्याने घेतलेल्या नावामुळे मोठमोठ्या लोकांना हादरा बसणार होता की काय ? हे प्रकरण दाखऊन ,त्याचा उहापोह करून राज्यपाल सत्यपाल मलिक साहेबांनी सत्य कथन केलेल्या पंतप्रधान मोदी वरील अरोपांच पुलवामा अटॅक प्रकरण झकायच होत का ? कसाब ची जशी चौकशी करून आंतरराष्ट्रीय पातळीवर काही आतंगवाद्याचे कनेक्शन तपासले गेले त्याच्यावर कितीतरी कोटीचा खर्च केला त्याला रोज पंचपक्वान्न,बिर्याणी खाऊ घालून गोड बोलून माहिती काढून घेतली तशी माहिती अतीक आणि अश्रफ यांच्याकडून  जेल मध्ये ठेऊन का नाही घेतली ? कारण अतीक हा राजकीय नेता असला तरी तो कुख्यात डॉन होता,त्याचे पाकिस्तान कनेक्शन उघड झाले होते,अबू सालेम पर्यंत ची पोराला बाहेर पळून लावण्याची त्याची फिल्डींग होती अस इतकं माहिती असताना अजून धागेदोरे हाती लागणाऱ्या आरोपीला दुसरेच शूटर येऊन मारावेत ? देशात कायदा न्याय पालिका आहे की नाही? इतका गुंडाराज काय कामाचा? अतीक अश्रफ हत्या अगोदर अतीक मी मारला जाणार हे आत्मविश्वासाने कसे सांगत होता त्याला कोणत्या अधिकाऱ्याने ही माहिती दिली ? हे सर्व कोणाचा तरी प्लॅन ने झाल की काय ? इतका तगडा बंदोबस्त असताना अतिशय छोट्या तीन पोरांनी येऊन धाड धाड एक नाही सतरा गोळ्या मारल्या तोवर पोलीस गप्प का होती ? त्यातील एकही गोळी ईतर कोणालाच लागली नाही हा योगायोग म्हणावा की प्रीप्लॅन ? त्यात तीन आरोपी होते, वेगवेगळ्या ठिकाणी होते मग क्रॉस लाईन होऊन एकमेकांना गोळ्या का लागल्या नाहीत ? इतर कोणीच जखमी झाले नाही मग अतीक आणि अश्रफ दोघेच का मेले ? इतका सटीक निशाणा असणारे शार्प शूटर हे कोणीतरी धाडलेले भाडोत्री शूटर असावेत? हे मूळ प्रश्न आहेत.हे घडवण्यामागाचा मुळ मोटो काय ? हे पाहणं गरजेचे आहे यावर मोठमोठी डिबेट व्हायला पाहिजे .पुलवामा अटॅक प्रकरण उचलून धरायला पाहिजे पण येथील मिंधा नॅशनल मीडिया हे करणार नाही कारण गुलाम पत्रकार, गुलाम मीडिया,गुलाम चॅनल आहेत यात रविष कुमार सारखा सच्चा हाडामासाचा पत्रकार खूप कमी आहेत जे बेधडक बोलतात सत्य बोलतात,सत्य दाखवतात.या सर्व गोष्टीवरून दाल में जरूर कूछ काला जरूर हैं.राहत इंदोरी यांचं एक वाक्य आठवलं "सरहदो पे बहुत तणाव हैं क्या ! पता करो देश में चूनाव हैं क्या ! म्हणजे निवडणूक आली की मुद्दामहून माहोल गरम करायचा छप्पन इंच छाती धोपटायची आणि हमले घडवून सत्तेत यायचं हाच फंडा वापरायचा यावेळी ह्या ओळी नक्कीच समर्पक ठरतात.कारण काहीतरी घडवून आपण कसे मोठे हेच दाखवून निवडणुकी जिंकल्या जातात.निरर्थक मुद्दे टिव्ही वर दाखवून जनतेच लक्ष मुळ मुद्यावरून जनिवपुर्वक हटवलं जातंय आणि याला भाडोत्री मीडियाचा जबाबदार आहे हे थांबवणं अत्यंत गरजेचे आहे.... 

*लेखन राजकीय अभ्यासक-मा.सम्राट डॉ.जीतीनदादा वंजारे खालापूरीकर संपर्क-९९२२५४१०३०*







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.