*भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच तथा फ्रिडम स्टोरी या मंचाचे वर्धा जिल्हान्तर्गत काव्यमैफिलीचे आयोजन*
नवोदित कवी वर्गाला त्यांच्या प्रगतीसाठी सहकार्याचा हात देणारी संस्था म्हणून भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच तथा फ्रिडम स्टोरी या संस्थेकडे पाहिले जाते. वेळोवेळी नाविन्यपूर्ण उपक्रम आयोजित करुन या संस्थेने नवोदितांना- तरूणांना संधी दिली.
या कार्यक्रमाला संमेलनाध्यक्ष म्हणून भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंचाचे *उपाध्यक्ष विजय जायभाये* त्याचप्रमाणे प्रमुख अतिथि म्हणून *कार्याध्यक्षा शिल्पा मुसळे,तसेच विशेष उपस्थिति म्हणून महिलाध्यक्षा चैताली कापसे*, मुख्य समिती सचिव सुमंत पाटील आणि वर्धा जिल्हा कार्याध्यक्ष चेतन परळीकर उपस्थित होते.
*नागपुर प्रदेश कार्याध्यक्षा श्वेता खोंडेकर* यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तसेच आभार प्रदर्शन नागपुर प्रदेश उपाध्यक्ष हेमंत देवगीरकर यांनी केले.


stay connected