*कुस्ती स्पर्धेत राज्य स्तरावर जनता वस्तीगृह शिक्षण संस्थेला मिळाले घवघवीत यश विद्यालयाच्या चार खेळाडूंचे महाराष्ट्रात वर्चस्व*

 *कुस्ती स्पर्धेत राज्य स्तरावर जनता वस्तीगृह शिक्षण संस्थेला  मिळाले घवघवीत यश विद्यालयाच्या चार खेळाडूंचे महाराष्ट्रात वर्चस्व*

💐💐💐💐💐💐💐💐


क्रीडा व युवक सेवा  संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय चंद्रपूर द्वारा आयोजित राज्यस्तरीय शालेय कुस्ती क्रीडा स्पर्धा 2023 मध्ये झालेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये  जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या पैलवानांनी केली कौतुकास्पद कामगिरी करून जनता संस्थेचे नाव राज्यात झळकावले  

1)19 वयोगटातील इ.12 वी.वेदिका सासने 76 kg. वजनगट महाराष्ट्रात प्रथम (गोल्ड मेडल )

2)19 वयोगटातील इ.12वी शिंदे दिव्या 72kg वजनगट (कास्य पदक )महाराष्ट्रात तृतीय क्रमांक 

3)19 वयोगटातील इ.12वी संजना डिसले वजनगट 59kg (कास्य पदक )महाराष्ट्रात तृतीय क्रमांक 

4)19 वयोगटातील इ.11वी.श्रुती येवले  वजनगट 50kg(कास्य पदक )महाराष्ट्रात तृतीय क्रमांक 

......जनता वस्तीगृह शिक्षण संस्थेचे सचिव माननीय विजयकुमार (आण्णा ) बांदल,अध्यक्ष सय्यद अब्दुल भाई,व्यवस्थापक विशाल (भैय्या )बांदल, मुख्याध्यापक /प्राचार्य  उत्तम गव्हाणेसर,उप प्राचार्य चव्हाण सर,  वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य विक्रम बांदल सर,उप.मु.ढोबळे सर,पर्यवेक्षक सय्यद ए.डी. सर यांनी सर्वांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या या सर्व खेळाडूंना क्रीडा शिक्षक प्राध्यापक गुरसाळी सर, झांजे सर, पठाण सर,

होळकर सर,मोरे सर व इतर सर्व शिक्षक सहकारी यांचे अनमोल व मोलाचे मार्गदर्शन लाभले.....









टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.