*नुकसानग्रस्त भागाची जयदत्त भैय्या धस यांनी बांधावर जाऊन केली पाहणी..*
आष्टी तालुक्यात वादळी वाऱ्यासह सर्वाधिक गारांचा पाऊस धामणगाव व कडा गटात झाला त्यामुळे शेतकऱ्यांना फटका बसला आहे. सुरुडी येथील महादेव गर्जे यांच्या अंगावर वीज पडून शेतकऱ्यांसह दोन शेळ्या दगावल्या होत्या.गर्जे कुटुंबांच्या घरी जाऊन सांत्वन भेट घेतली.. कारखेल बुद्रुक येथील लमाण तांडा येथील प्राथमिक शाळा व परिसरातील जवळपास १० घरावरील पत्रे उडून गेलेत त्या कुटुंबाच्या भेट घेतली.सांगवी पाटण येथील ऋषिकेश खोटे यांच्या शेतमधील मका,कांदा गहू संत्री इत्यादी फळ बागांची नुकसानीची पाहणी केली.तसेच धामणगाव येथील झिंजूर्के वस्ती येथे संत्री ,डाळिंब, कांदा, गहू, मका यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले पिकांची पाहणी करूनत्या संबंधित अधिकाऱ्याला पंचनामा करण्याचे विनंती केली.केरुळ येथील जाकीर शेख यांच्या द्राक्षाच्या बागेची मोठ्या प्रमाणात नुकसानाची पाहणी केली.सुरुडी व कारखेल बुद्रुक येथील वादळामुळे पोल व तारी खाली पडल्या आहेत.त्यामुळे त्यांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता.. त्या संबंधित अधिकाऱ्यांना वीज सुरळीत करण्याची विनंती केली .. युवा नेते जयदत्त भैय्या धस यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून वस्तुस्थितीची आ.सुरेश आण्णा धस यांना कल्पना दिली.या भागातील संबंधित अधिकाऱ्यांना आ.धस यांनी तात्काळ पंचनामे करावेत आदेश दिले.
यावेळी चेअरमन संजय नाना गाढवे, मा.सभापती शत्रुघ्न मरकड, सरपंच अशोक गर्जे, सरपंच दत्तात्रय खोटे,सरपंच मनोज गाढवे,सरपंच विकास पवार, सरपंच सुनील सूर्यवंशी, जाकिर शेठ शेख,उपसरपंच अकील सय्यद,राजू भोसले ,उपसरपंच राहुल खिलारे,सरपंच संजय जाधव,तुकाराम पवार,राघव खिलारे,सद्दाम शेख ,किरण खिलारे,अजय मरकड,हनुमंत झिंजूर्के,आय्यास शेख, समीर शेख आणि मोठ्या प्रमाणावर शेतकरी उपस्थित होते..
stay connected