Ashti ; तालुक्यातील शेतकऱ्यांनी मागेल त्याला shet tale या योजनेचा लाभ घ्यावा
आष्टी तालुका हा कोरडवाहू तालुका आहे. तसेच पावसाच्या आगमनाचा कालावधी अनियमित आहे आणि पावसाळ्यात अनिश्चित कालावधीचा खंड पडत असतो, हे आपणा सर्वांना माहित आहे. यामुळे पीक उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात घट येते व पर्यायाने शेती व्यवसाय फायदेशीर राहत नाही. याकरिता पाण्याचा शाश्वत स्रोत निर्माण करणे गरजेचे आहे.
महाराष्ट्र शासनाने कृषी विभागाच्या माध्यमातून मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना अंतर्गत वैयक्तिक शेततळे देण्यात येत आहेत. त्याकरीता पात्रता निकषांमध्ये अर्जदार शेतकऱ्यांच्या नावावर किमान 0.60 हेक्टर जमीन असावी, जमीन तांत्रिकदृष्ट्या योग्य असावी तसेच यापूर्वी शासकीय योजनेतून शेततळ्याचा लाभ घेतलेला नसावा.
सदरील शेततळ्यासाठी अनुदान मर्यादा खालील प्रमाणे राहील.
*आकारमान इनलेट/आऊटलेट विरहित*
1)15*15*3 =18621, 2)20*15*3=26774, 3)20*20*3=38417, 4)25*20*3=50061 5)25*25*3= 65194, 6)30*25*3=75000, 7)30*30*3=75000, 8)34*34*3=75000
*इनलेट/आऊटलेट सहित*
1)15*15*3=23881, 2)20*15*3=32034, 3)20*20*3=43678, 4)25*20*3=55321, 5)25*25*3=70455, 6)30*25*3=75000, 7)30*30*3=75000, 8)34*34*3=75000,
या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर *https://mahadbtmahit.gov.in* संकेतस्थळावर अर्ज ऑनलाईन करावा.
'शेत तेथे शेततलाव' असल्यास कोरडवाहू भागातील शेती फायदेशीर राहणार आहे. पिकाला पाण्याचा ताण पडल्यावर पाणी देण्याची व्यवस्था असणे गरजेचे आहे. त्याकरीता शेत तलावाच्या माध्यमातून पाण्याचा संरक्षित साठा निर्माण करणे गरजेचे आहे. सदरील शेततळ्याच्या अस्तरीकरणासाठीही एकात्मिक फलोत्पादन अभियान व राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत 50 टक्के प्रमाणे 75 हजार रुपये पर्यंत अनुदान देय आहे. त्यामुळे आष्टी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या वतीने आवाहन करण्यात येते की जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा.
stay connected