मुंबई पुणे एक्स्प्रेस मार्गावर गुरुवार दि 27 रोजी दुपारच्या सुमारास 8 ते 10 वाहनांचा भिषण अपघात झाला असुन यात जवळपास 10 व्यक्ती गंभीर जखमी असल्याची माहिती मिळत आहे . खोपोली जवळ एक्झीट जवळ हा अपघात झालेला आहे . यान 8 ते 10 वाहने एकमेकांवर आदळलेली दिसत आहेत . आपण पाहु शकता अपघाताची भिषणता किती आहे तेच या दृष्यांमधून लक्षात येऊ शकते . या अपघातांमधे अनेक कार तसेच ट्रकचा समावेश आहे . घटनास्थळी बोरघाट पोलीस यंत्रणा पोहोचलेली आहे . जखमींना खोपोली ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे काही जखमीना MGm रुग्णालयात दाखल केले आहे जखमींचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे . मुंबईकडे जाणारी वाहतुक ठप्प झालेली आहे . अपघात नेमका कशामुळे झालाय हे अद्याप समजू शकलेले नाही .
तेजवार्ता प्रतिनिधी संजय पंडीत मुंबई
stay connected