पत्रकार रहेमान सय्यद यांना पद्मपाणी राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार प्रदान
कडा (प्रतिनिधी) सायं दै.बीड सिटीझन चे कडा प्रतिनिधी पत्रकार सय्यद रहेमान सय्यदअली यांना पद्मपाणी प्रतिष्ठान बीड मार्फत पद्मपाणी राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता हा मानाचा पुरस्कार मान्यवरांच्या उपस्थितीत बीड येथिल यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात प्रदान करण्यात आला.
कडा येथील निर्भिड पत्रकार सैदव आणि सातत्याने सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रांमध्ये स्वतः ला वाहून घेत समाजाचा भारवाहक म्हणून कार्य करणारे, धडाडीचे पत्रकार वास्तववादी व संवेदनशील लिखाण करणारे पत्रकार रहेमान सय्यद यांच्या सर्वोत्तम कार्याची नोंद घेत पद्मपाणी राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता सन २०२२-२०२३ या वर्षीचा मानाचा पुरस्कार संपादक तथा उद्योजक विजयराजजी बंब, संपादक तथा पत्रकार संघाचे अध्यक्ष वैभव स्वामी यांच्या हस्ते संपादक दिलीप तरकसे, सिंधुताई तरकसे, शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी, उद्योजक रत्नदिप कांबळे,विक्रम (बप्पा) मुंडे,खान सबिहा बेगम, पत्रकार संदिप बेंद्रे, सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेशजी ढवळे,प्रविण तरकसे, मुक्त पत्रकार एम एस युसूफ आदी मान्यवरांच्या उपस्थितीत ५मार्च २०२३ रविवार रोजी बीड येथिल यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात प्रदान करण्यात आला.यावेळी शेख युनुसभाई,बाबु तारु, पद्मपाणी प्रतिष्ठान चे सर्व पदाधिकारी, सदस्य व इतर उपस्थित होते.हा मानाचा पुरस्कार पत्रकार रहेमान सय्यद यांना मिळाला याबद्दल शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदासजी आपेट,बीड जिल्हा अध्यक्ष शेख अजिमोद्दिन,मा.सरपंच प्रा.राम बोडखे,मा.ग्रा.सदस्य प्रमोद उर्फ बंटी गायकवाड, डॉ.शेख नदिम, शिवसंग्राम चे आष्टी तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर दादा चौधरी, रफिक नायाब, पत्रकार शेख महेशर,मा.उपसरपंच दादासाहेब राऊत, पत्रकार शेख जावेद, संपादक सय्यद बबलूभाई, पत्रकार संदिप जाधव, पत्रकार अनिल मोरे, प्रतापसिंग परदेशी, सागर बोराटे,अल्ताब शेख,अजहर पानसारे आदींनी अभिनंदन केले.
stay connected