धाडसी नाभिक कन्या अपेक्षा शेटेचा पुण्यात होणार सन्मान, राष्ट्रीय जनसेवा पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीने महिला दिनाचे आयोजन

 धाडसी नाभिक कन्या अपेक्षा शेटेचा पुण्यात होणार सन्मान,
राष्ट्रीय जनसेवा पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीने महिला दिनाचे आयोजन




प्रतिनिधी : संजय पंडित


सलून व्यवसायात पदार्पण करून पुरुषांच्या मक्तेदारीला मोडीत काढणारी कराडची धाडसी नाभिक कन्या अपेक्षा शेटे हिचे राज्यभरातून कौतुक झाले होते.

नाभिक समाजातील सर्वच समाज कार्यकर्त्यांनी आणि संघटनांनी तिच्या या क्रांतिकारी निर्णयाचे स्वागत करून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला होता.

अनेक संघटनांनी विविध कार्यक्रमातून अपेक्षाचा सन्मान करून तिला पुरस्काराने सन्मानित केले होते.

राष्ट्रीय जनसेवा पक्षाच्या पिंपरी चिंचवड शहर आणि पुणे जिल्हा महिला आघाडीच्या वतीने संतोष नगर कात्रज पुणे येथे गुरुवार दि.९ मार्च रोजी दुपारी १ वाजता महिला दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमात धाडसी नाभिक कन्येचा विशेष गौरव करण्यात येणार आहे.

तसेच याच कार्यक्रमात नाभिक समाजा व्यतिरिक्त इतर समाजातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांना देखील विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याचे पिंपरी चिंचवड विभाग महिला अध्यक्षा विनायाताई संबेटला आणि पक्षाच्या उपाध्यक्षा वनिता ताई भालेकर यांनी सांगितले.

अपेक्षा शेटे सोबतच भूमाता ब्रिगेडियरच्या अध्यक्ष तृप्तीताई देसाई,कथा काव्य लेखिका पुरस्कार प्राप्त पुष्पाताई भंटार आदी मान्यवर महिलांना याच कार्यक्रमात विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय जनसेवा पक्षाचे उपाध्यक्ष तथा ख्यातनाम आयुर्वेदाचार्य डॉ.अरविंद झेंडे यांच्या कात्रज येथील क्लिनिक येथे करण्यात आले असून सदर कार्यक्रमास राष्ट्रीय जनसेवा पक्षाच्या महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्षा वनिताताई भालेकर,संघटक बेबीताई कऱ्हेकर,पुनमताई राऊत,वैशालीताई चौधरी तसेच पुणे जिल्हा अध्यक्ष भगवानराव शिंदे,उपाध्यक्ष डॉ.अरविंद झेंडे,प्रदेश सल्लागार अरुण कालेकर,दत्ताजी गोरे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील नाभिक समाज भगिनींनी जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन महिला आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.


लवकरच राष्ट्रीय जनसेवा पक्षाच्या वतीने सामाजिक बांधिलकी म्हणून धाडसी कन्या अपेक्षाचा तिच्या घरी जाऊन जाहीर सत्कार करण्यात येणार असल्याचे जनसेवा पक्षाचे उपाध्यक्ष संजय पंडित यांनी यावेळी सांगितले.

या सन्मान सोहळ्यास पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महावीर गाडेकर यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी उपस्थित राहणार असून धाडसी कन्या अपेक्षा हिला पक्षाच्या वतीने एक सलून खुर्ची आणि एक ब्युटी पार्लर खुर्ची भेट म्हणून देण्यात येणार आहे.







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.