*महीला चा सन्मान व सुरक्षीता करणे म्हणजेच महिला दिन साजरा करणे . सुवर्णा जाधव* . ( *अंगणवाडी सेविका अहमदनगर* )

 *महीला चा सन्मान व सुरक्षीता करणे म्हणजेच महिला दिन साजरा करणे . सुवर्णा जाधव* . ( *अंगणवाडी सेविका अहमदनगर* )   

       जागतिक महिला दिनाबद्दल तुम्ही अनेकदा ऐकलं असेल, कधी माध्यमांमधून तर कधी आपल्या आसपासच्या लोकांच्या . संभाषणातून.ज्याला स्त्री 'आई' म्हणून कळली, 


तो जिजाऊचा शिवबा झाला, 


ज्याला स्त्री 'बहिण म्हणून कळली 


तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला, 


ज्याला स्त्री 'मैत्रीण' म्हणून कळली, 


तो राधेचा श्याम झाला, आणि 


ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळली, 


तो सीतेचा राम झाला !'




प्रत्येक महान व्यक्तींच्या जीवनात आणि यशात स्त्रियांचा सिंहाचा वाटा आहे. अशा या स्त्रीशक्तीला प्रथम माझा मानाचा मुजरा !


शिवरायांच्या हिंदवी स्वराज्य स्थापन करण्या मागील प्रेरणा असणाऱ्या माता जिजाऊ, स्वातंत्र्याची चेतना देणाऱ्या राणी लक्ष्मीबाई आणि स्त्री शिक्षणा साठी झटणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या सर्व स्त्रियांच्या कार्याला वंदन


पण हा दिवस नक्की का य आहे? हा साजरा करायचा असतो की यादिवशी आंदोलन करायचं असतं. हा जागतिक पुरुष दिनासारखाच असतो का?


जवळपास एका शतकाहून जास्त काळ 8 मार्च हा दिवस महिलांसाठी खास समजला जातो. पण का?


क्लारा झेटकीन या महिलेने 1910 साली जागतिक महिला दिनाची सुरुवात केली. या दिवसाचा उगम कामगार चळवळीतून झाला.


याचं बीज रोवलं गेलं ते 1908 साली जेव्हा 15 हजार महिलांनी न्यूयॉर्कच्या रस्त्यांवर मोर्चा काढला. कामाचे कमी तास, चांगला पगार आणि मतदानाचा अधिकार अशा त्यांच्या मागण्या होत्या.


भारतातील बालविवाह पुढच्या दोन वर्षांत थांबतील का?

25 फेब्रुवारी 2023

65व्या वर्षी ICWA अभ्यासक्रम पहिल्या प्रयत्नात पास करणाऱ्या विनया नागराज

11 एप्रिल 2021

किती मुलं जन्माला घालावीत? महिला ठरवणार की सरकार सांगणार?

11 जुलै 2022

यानंतर एका वर्षाने सोशालिस्ट पार्टी ऑफ अमेरिका या पक्षाने पहिल्या राष्ट्रीय महिला दिनाची घोषणा केली.


हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्याची कल्पना पुढे आणली ती क्लारा झेटकीन या महिलेने. त्या साम्यवादी विचारसरणीच्या कार्यकर्त्या होत्या आणि महिला हक्कांच्या पुरस्कर्त्या. त्यांनी ही कल्पना सर्वप्रथम काम/नोकरी करणाऱ्या महिलांच्या परिषदेत कोपेनहेगनमध्ये 1910 साली मांडली होती.


त्या परिषदेला 17 देशांमधून 100 महिला उपस्थित होत्या. सगळ्यांनी क्लारा यांची कल्पना एकमुखाने मान्य केली.


त्यानुसार पहिला जागतिक महिला दिवस 1911 साली ऑस्ट्रिया, डेन्मार्क, जर्मनी आणि स्वित्झरलँडमध्ये साजरा केला गेला होता. त्याची शताब्दी 2011 साली साजरी झाली.


महिला दिवसाला संयुक्त राष्ट्रांची अधिकृत मान्यता 1975 साली मिळाली, तर प्रत्येक वर्षांची खास थीम स्वीकारायला सुरुवात झाली 1996 साली. पहिलं घोषवाक्य होतं – ‘भूतकाळ साजरा करताना भविष्याची धोरणं ठरवणं.’


महिला दिन 

सध्या जागतिक महिला दिन हा महिलांच्या विविध क्षेत्रातील प्रगतीचे मैलाचे दगड साजरे करण्याच्या उद्देशाने सर्वत्र साजरा केला जातो.


तसंच या दिवशी अजूनही समाजात अस्तित्वात असलेल्या असमानतेविरोधात निदर्शनंही केली जातात.


8 मार्च हीच तारीख का?

क्लारां झेटकिन यांनी जेव्हा महिला दिवसाची कल्पना मांडली तेव्हा त्यांच्या मनात कोणतीही ठराविक तारीख नव्हती. ती तारीख ठरली 1917 साली.


तेव्हा पहिलं महायुद्ध सुरू होतं आणि त्यादरम्यानच रशियन महिलांनी ‘भाकरी आणि शांतता’ अशी मागणी घेऊन संप पुकारला. चार दिवसांनी राजकीय उलथापालथ झाली, रशियन झारना पद सोडावं लागलं आणि त्यानंतर आलेल्या हंगामी सरकारनं महिलांना मतदानाचा अधिकार दिला.


रशियात तेव्हा ज्युलियन कॅलेंडर वापरलं जात होतं. ज्युलियन कॅलेंडरप्रमाणे ज्या दिवशी महिलांनी संप पुकारला त्या दिवशी तारीख होती 23 फेब्रुवारी. ग्रेगोरियन कॅलेंडर (जे आज आपण सगळीकडे वापरतो) त्यानुसार ही तारीख होती 8 मार्च. त्यामुळेच त्या ऐतिहासिक संपाची आठवण म्हणून 8 मार्चला जागतिक महिला दिवस साजरा केला जातो. 

*सौ सुवर्णा  संतोष जाधव . अंगणवाडी सेविका . अहमानगर* .





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.