*आष्टी महावितरण कर्मचाऱ्यांच्या दमदार कामगिरीचे कौतुक....*
************************
आष्टी (प्रतिनिधि)
आष्टी शहरातील पंचायत समितीसमोरील औदुंबर नगरमध्ये अवकाळी पावसाने गेल्या दोन दिवसापासून विद्युत पुरवठा खंडित झाला होता.
नवीन ट्रान्सफॉर्मर बसवून कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमाने दोन दिवसात विद्युत पुरवठा पुरवत सुरळीत करण्यात आला. यावेळी उपकार्यकारी अभियंता प्रवीण पवार, लाईनमन शिवाजी गोरे, करडकर, बाळू धुमाळ, दत्ता बिबे, आशिष नवले, ऋषिकेश गदादे, गिरी, मनोज निंबाळकर. महेश सोले, भराटे,आदि महावितरण कर्मचाऱ्यांच्या या दमदार कामगिरीबद्दल भागातील नागरिकांतून समाधान व्यक्त करत कौतुक होत आहे.
stay connected