‘आमच्या पक्षात या नाहीतर तुरुंगात जा’हे भाजपाचे धोरण - उद्धव ठाकरे

 ‘आमच्या पक्षात या नाहीतर तुरुंगात जा’हे भाजपाचे धोरण - उद्धव ठाकरे



मुंबई : ‘सूडभावनेतून विरोधकांवर आरोप केले जात आहेत. तसेच भाजपाच्या विरोधात जे बोलतात त्यांना तुरुंगात जावे लागते’. अशी टीका उद्धव ठाकरे यांनी भाजपावर केली आहे. ते मुंबई येथील एका पत्रकार परिषदेत बोलत होते.



राज्याचा सत्तासंघर्ष दिवसेंदिवस वाढत चालला आहे. शिवसेनेतली फूट व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेना नाव व धनुष्यबाण चिन्ह मिळाल्याने ठाकरे गट आक्रमक झाला आहे.

याच मुद्यावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला आणि त्यावेळी भाजपावर टीका केली आहे.



पुढे बोलताना ठाकरे म्हणाले, आमच्यातलेही जे लोक पक्षात घेतले आहेत त्यांच्यावर काय गोमूत्र शिंपडले का? ते काय शुद्ध झाले का? आत्ता आमच्या लोकांच्या मागे लागला आहात ते जर तुमच्या पक्षात आले तर पवित्र झाले असं जाहीर करणार का? भाजपाचा हा जो सत्तापिपासूपणा आहे तो लोकांना समजला आहे असे म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे प्रमुख केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून विरोध करणा-यांना बेजार करायचे.



आमच्या पक्षात या किंवा तुरुंगात जा हे धोरण वापरायचं. हर्षवर्धन पाटील मध्यंतरी बोलले होते ना ‘भाजपात आलो आता मला शांत झोप लागते’ तशी अवस्था करायची. मध्य प्रदेशच्या मंत्र्यानेही विरोधकांना दम दिलाय की भाजपात या किंवा कारवाईच्या बुलडोझरला सामोरे जा. आता जनतेच्या मताचा बुलडोझर भाजपावर चालल्याशिवाय राहणार नाही, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.