*गांधी महाविद्यालयामध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा*
कडा (प्रतिनिधी): येथील श्री अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळा चे गांधी महाविद्यालय व रसिकलाल एम धारीवाल डी फार्मसी कॉलेज कडा यांच्या संयुक्त विद्यमाने दि ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन उत्साहात साजरा झाला .
या कार्यक्रमाचे अध्यक्ष गांधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन एस राठी होते तर प्रमुख व्याख्याते म्हणून मा. डॉ. पूनम मार्कंडे (मार्कंडे हॉस्पिटल कडा)आणि मा. डॉ. शुभांगी घोडके (मेडिकल ऑफिसर कुंटेफळ) तर प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर मा.सौ सुनीता पोखरणा, सौ. रश्मी पटवा,सौ. स्मिता कटारिया, सौ. तृप्ती मेहेर ,सौ. प्रिया चानोदिया, सौ. भाग्यश्री पटवा, सौ. सपना भंडारी उपस्थित होत्या.
डी फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. महेश मस्के, गांधी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. जे एम भंडारी व बी. फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. गफार सय्यद व श्री सोभाचंद ललवाणी हे व्यासपीठावर उपस्थित होते. महिला दिनानिमित्त कडा परिसरातील उपस्थित असलेल्या महिलांचे व विद्यार्थिनींचे मोफत हिमोग्लोबिन आणि कॅल्शियमचे चेकअप यावेळी करण्यात आले. त्यासाठी गांधी हॉस्पिटल लॅब कडा, मातृसेवा लॅब कडा यांचे सौजन्य लाभले. प्रास्ताविक करताना डॉ. मीरा नाथ (रणरागिनी महिला संघटना अध्यक्ष) म्हणाल्या की आष्टी तालुक्याच्या प्रत्येक बस स्थानकावर स्वच्छतागृह पाहिजे .यासाठी रणरागिनी महिला संघटनेमार्फत आम्ही सर्व प्राध्यापिका 2016 पासून काम करत आहोत. कारण शेकडो शालेय व महाविद्यालयीन मुलींच्या आरोग्याचा प्रश्न आहे.
तसेच शिक्षण अर्ध्यावर सोडलेल्या मुलींना परत शैक्षणिक प्रवाहात आणण्याचे काम रणरागिनी महिला संघटना आणि गांधी महाविद्यालयाचे महिला सेल अंतर्गत चालू आहे.
प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत असताना सौ. सुनीता पोखरणा म्हणाल्या की, महिलांनी प्रत्येक क्षेत्रात स्वतःला सिद्ध केले आहे. तिच्या अंगी जग जिंकण्याचे सामर्थ्य आहे. तसेच महिला दिनानिमित्त सर्व महिलांना त्यांनी शुभेच्छा दिल्या.
डॉ. सौ. पूनम मार्कंडे यांनी आपल्या मार्गदर्शनात स्त्रियांनी स्वतःच्या आरोग्यासाठी योग्य आहार, योग्य योगासने आणि
झोप घेणे आवश्यक आहे आणि विद्यार्थ्यांनी फास्ट फूड जंक फूड कोल्ड्रिंक्स यापासून दूर राहावे. ते आपल्या आरोग्यास किती घातक आहे याविषयी मार्गदर्शन केले .
डॉ. सौ शुभांगी घोडके यांनी आपल्या व्याख्यानात मुलींसाठी आणि महिलांसाठी काही आवश्यक आणि महत्त्वाच्या लसी बद्दल सखोल माहिती दिली. हिमोग्लोबिन आणि कॅल्शियमच्या वाढीसाठी आहारात कशाचा समावेश असावा याबद्दल मार्गदर्शन केले.
अध्यक्ष समारोप करताना प्राचार्य डॉ. एन एस राठी यांनी टाईम मॅनेजमेंट खरोखरच महिलांकडून शिकावे आणि समाज कार्यात अग्रेसर असणाऱ्या अनेक महिलांचे दाखले दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अरुणा कुलकर्णी यांनी केले. तर प्रा. धनश्री मुनोत यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. गरुड मॅडम, प्रा. सागडे मॅडम, प्रा. कोल्हे मॅडम आणि श्रीमती घोडके मॅडम यांचे सहकार्य लाभले.
या कार्यक्रमासाठी गांधी महाविद्यालय तसेच डी फार्मसी कॉलेज तसेच मोतीलाल कोठारी विद्यालय, चंदनमल भळगट प्राथमिक शाळा, अमोलक युनिव्हर्सल इंग्लिश स्कूल या विभागातील सर्व महिला उपस्थित होत्या. तसेच कडा परिसरातील महिला आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
stay connected