वादळी पावसाने फळबागांचे मोठे नुकसान
धानोरा / अशोक अडागळे
आष्टी तालुक्यात अनेक ठिकाणी वादळी वारा , पाऊस व गारपीट झाल्याने अनेक फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे . काढणीला आलेल्या फळबागांची फळांची गळती झाली आहे . संत्रा , डाळींब , लिंबू , आंबा या फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे . बाळेवाडी येथेही वादळी वारा व पाऊस झाल्यामुळे महादेव पठारे यांच्या दोन एकर संत्रा बागेतील काढणीला आलेल्या फळांचे नुकसान झाले . सोमवार व मंगळवारी आष्टी तालुक्यात अनेक ठिकाणी वादळी वार्याने शेतकर्यांचे जे नुकसान झाले त्याचे पंचनामे करून शासनाकडून शेतकर्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी वर्गातुन होत आहे . तालुका कृषी अधीकारी गोरख तरटे साहेब याविषयी बोलताना म्हणाले कि तहसिलदार साहेब आष्टी यांच्या मार्गदर्शना खाली स्थानिक ग्राम प्रशासनाला त्या त्या भागातील शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करून नुकसानीचा अहवाल शासनास कळवला जाईल . तसेच यापुढील आणखी ४ / ५ दिवसानंतर वातावरण खराब असण्याची शक्यता आहे म्हणून शेतकर्यांनी खबरदारी घ्यावी व काढणीयोग्य पिक तात्काळ काढणी करून बाजारात विकावे . जेणे करून शेतकऱ्यांचे सांभाव्य नुकसान टळेल . असे तरटे साहेब यांनी तेजवार्ताशी बोलताना सांगीतले .
stay connected