आष्टी तालुक्यात व आष्टी शहरात चालू असलेल्या खडकत चौक ते खडकत या रस्त्याचे काम अंत्यत निकृष्ट दर्जाचे - संपत सायकड
आष्टी प्रतिनिधी
आष्टी तालुक्यात व आष्टी शहरात चालू असलेल्या खडकत चौक ते खडकत या रस्त्याचे काम अंत्यत निकृष्ट दर्जाचे चालु असुन त्या कामाची विभागीय गुणनियंत्रण विभागा मार्फत तपासणी केल्या शिवाय कोणालाही कामाचे बिले अदा करू असे सामाजिक कार्यकर्ते संपत सायकड आष्टी यांनी उपविभागीय अधिकारी साहेब, सार्वजनिक बांधकाम उपविभाग, आष्टी ता. आष्टी जि.बीड यांना लेखी निवेदनाद्वारे केली आहे निवेदनात पुढे म्हटले आहे की आपल्या कार्यालया अंतर्गत आष्टी तालुक्यात चालु व झालेल्या कामाचे मोठया प्रमाणावर अनियमतता व भ्रष्टाचार झालेला आहे व भ्रष्टाचार चालु आहे. रोडच्या बांधकामामध्ये डस्ट, चुर, याचा प्लास्टरमध्ये मोठया प्रमाणात उपयोग करून भ्रष्टाचार चालु आहे. या आधीही अनेक पत्र देवून कळवले आहे. परंतु सबंधित अधिकारी व गुत्तेदार यांच्या संगनमताने हे सर्व कामाचा भ्रष्टाचार चालु आहे. कारण कोणत्याही कामावर कोणताही अधिकारी व इंजिनिअर हजर नसतो त्यामधीलच एक काम म्हणजेच आष्टी येथील खडकत चौक ते खडकत या रस्त्याचे काम सध्या चालु असुन ते काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे चाललेले आहे. त्यामध्ये अधिकारी व गुत्तेदार हे संगनमत करून रोडमध्ये वरील निकृष्ट दर्जाचे बांधकाम मटेरियल मिसळून काम करीत आहेत. त्यांची वरिष्ठामार्फत व गुणनियंत्रण विभागामार्फत तात्काळ चौकशी करण्यात यावी जोपर्यंत विभागीय गुणनियंत्रणा मार्फत चौकशी होत नाही तो पर्यंत कोणत्याही कामाचे बिले अदा करण्यात येवू नये ही असे सामाजिक कार्यकर्ते सपंत सायकड यांनी निवेदनात म्हटले आहे
stay connected