*युवा ग्राम येथे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन चर्चासत्र संपन्न...*
केज (प्रतिनिधी) दि.११ रोजी केज येथील युवा ग्राम विकास केंद्र चिंचोली फाटा येथे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते..
सदरील माहिती अशी की, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजदिप बनसोड यांच्या उपस्थितीत युवा ग्राम विकास केंद्र येथे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.सर्व प्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून सुरुवात करण्यात आली. राजदिप बनसोड यांनी आपत्ती व्यवस्थापन या विषयावर सविस्तर असे मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, आपत्ती म्हणजे अचानक घडलेली घटना म्हणजे आपत्ती होय. यामध्ये पुर, भुकंप,विज,भुस्खलन,युद्ध अशा वेगवेगळ्या घटना म्हणजे आपत्ती होय. ज्या वेळेष एखादी घटना किंवा आपत्ती आली तर आपण काय केले पाहिजे,वीज पासून आपण बचाव कसा करावा,पुर किंवा भुकंप झाला तर आपण सर्वप्रथम काय केले पाहिजे.बचाव कार्य कसे असते या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले.तसेच डॉ हनुमंत सौदागर व एच पी देशमुख यांनी मार्गदर्शन केले.या चर्चासत्रामध्ये वेगवेगळ्या सेवाभावी संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते. या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजदिप बनसोड, प्रमुख पाहुणे डॉ हनुमंत सौदागर, व एच पी देशमुख,नागेश कराळे, पत्रकार रंजित घाडगे व इतर प्रतिनिधी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काळे प्रकाश यांनी केले व आभारप्रदर्शन संतोष रेपे सर यांनी केले..
stay connected