कडा येथील मंगेश रमेश पवळ याची फॉरेस्ट ऑफिसर पदी निवड झाली .
अनिल मोरे /कडा .
आष्टी तालुक्यातील कडा येथील रहिवासी असलेल्या तरुण मंगेश रमेश पवळ याची लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत तो उत्तीर्ण होउन तो महाराष्ट्रात अवल तिसरा क्रमांक पटकावला व तो थेट फॉरेस्ट ऑफिसर पदी नियुक्ती झाली.
वडील रमेश पवळ व आई सुशाला पवळ यांनी अतिशय हालाकिमध्ये आपला संसार संसार थाटुन अतिशय गरीब असल्या कारणाने त्यानी हातावरचे पोट असून सुद्धा मोठा मुलगा मंगेश व लहान मुलगा मयुर यांचे शिक्षण पुर्ण करुन लहान मुलगा मयुर रमेश पवळ पोलीस निरीक्षक बनला तो सध्या नाशिक येथे ट्रेनिंग चालू आहे.व मोठा मुलगा मंगेश रमेश पवळ हा सुध्दा फॉरेस्ट ऑफिसर पदाची निवड झाली .
रमेश पवळ यांचे लहानशे सलुनचे दुकान असुन त्यानी आपले घर चालवताना मुलाना काही सुद्धा कमी पडु दिले नाही आई सुध्दा घरकाम करुन लोंकाच्या शेतात काम करत आपले स्वप्न आपल्या मुलांनी पुर्ण केले अशा शब्दात व्यक्त केले.
stay connected