टाकळी आमिया येथील खंडोबा देवस्थानच्या जमीनीतील मुरुम गेला चोरी .
अनिल मोरे/कडा.
आष्टी तालुक्यातील टाकळी आमिया येथे खंडोबा देवस्थान मंदिर असुन या देवस्थानची 4हेक्टर 19गुंठे जमीन असुन या जमीनीतुन 15ते16गुंठे मुरुम रात्रीच्या वेळी जेसीबी व ट्रॅक्टरच्या साह्याने वाहतुक करुन मुरुमाची चोरी झाली.
महादेव बाबु वाघे (मोरे)हे खंडोबा देवस्थानचे पुजारी असुन कडा येथील रहीवासी असुन तेदर रविवारी पुजा करण्यासाठी टाकळी आमिया येथे जातात व त्यानी आठ दिवसापुर्वी जमिनीची पाहणी केलु असता त्यानु पाहीले की जमीनीतील मुरुम चोरीला गेल्याचे निदर्शनास आले व त्यानी त्याचा मुलगा अनिल मोरे यास सांगितले की आपल्या जमिनीतील मुरुम चोरीला गेला आहे .
तरी तहसीलदार याना निवेदन दिले असुन त्यानी असे आश्वासन दिले आहे की मी मंडल अधिकारी व तलाठी यांना पत्र देऊन त्याना तपास करण्यासाठी सांगत आहे .
महसुल विभागानी याची वेळीच दखल घेउन पंचनामा करुन वाहन धारकावर वेळीच कारवाई नाही केली तर वाहन धारक मोकाट सुटतील
व चोरीला आळा बसणार नाही.
महसुल विभागाला कसली माहीती न देता व पुजारी यानां कसल्याही प्रकारची माहिती न देता मुरुमाची चोरी केली यांची चौकशी करुन जो कोणी या मुरुमाची चोरी केली आहे त्याच्यावर गुंन्हे दाखल करून वाहने जप्त करुन आम्हाला आमची नुकसान भरपाई भरुन द्मावी.
stay connected