वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तींचे पुरस्कारासाठी प्रस्ताव आमंत्रित कला फाउंडेशन रजि.नं.२७३१३ पिंपळोद ता. दर्यापूर जि. अमरावतीद्वारा आयोजित राज्यतरीय पुरस्कार सोहळा २०२३

 वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तींचे पुरस्कारासाठी प्रस्ताव आमंत्रित 
कला फाउंडेशन रजि.नं.२७३१३ पिंपळोद ता. दर्यापूर जि. अमरावतीद्वारा आयोजित राज्यतरीय पुरस्कार सोहळा २०२३


सुनील शिरपुरे/यवतमाळ



दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील कला फाउंडेशन यांच्या वतीने कर्तबगार, समाजासाठी झटणा-या  शिक्षण प्रेमी, निसर्ग प्रेमी अशा अनेक पैलूवर स्त्री, पुरुष यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येत असते. ज्यात कला, क्रीडा, साहित्य, पर्यावरण, गायन, चित्रकार, सामाजिक अशा विविध क्षेत्रात सदैव अग्रेसर असणा-या, उल्लेखनीय कार्य करणा-या स्त्री-पुरुषांचा गुणगौरव होत असतो. आपण समाजात वावरत असतांना साहित्याच्या माध्यमातून, अभिनय, कलापथक किंवा इतर कुठल्याही क्षेत्रात कोणतीच अपेक्षा न बाळगता अगदी नि:स्वार्थी भावनेने, श्रीमंत मनाने आपण समाजाची सेवा करत असता. आपल्या कार्याचा, साहित्याचा, कलेचा, मानसन्मान व्हावा. आपल्या साहित्याला धार यावी, कार्याला गती यावी. या उदात्त हेतुने आमच्याकडून कला फाउंडेशनच्या माध्यमातून प्रत्यक्ष आपल्याला पुरस्कार देऊन गौरविण्यात येत आहे. कला फाउंडेशन पिंपळोद द्वारा आयोजित राज्यतरीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन समितीने केले आहे. महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त (समाज सुधारक डॉ.भीमराव आंबेडकर) हा पुरस्कार देऊन मोठ्या सन्मानाने सन्मानित करण्यात येईल. तरी आवड असलेल्या व्यक्तींना प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन करण्यात येत आहेत.

पत्ता: कला फाउंडेशन अध्यक्ष 

प्रशांत नारायण दामले

मु.पो.पिंपळोद ता.दर्यापूर जि.अमरावती राज्य महाराष्ट्र ४४४ ७०६

अधिक माहितीसाठी संपर्क- ८६०५५२१३६९







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.