राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या केज तालुका अध्यक्ष पदी - रंजित घाडगे, तालुका सचिव पदी अनिल वैराग, तर कार्याध्यक्ष पदी- जयद्रथ गायकवाड यांची सर्वानुमते घोषणा.
_______________________________________
बीड येथे एकदिवसीय कार्यशाळेत राष्ट्रीय उपाध्यक्ष - विजयकुमार वाव्हळ यांच्या नियुक्ती पत्र व ओळख पत्र, पत्रकारांचा सन्मान होणार..!
_______________________________________
केज. प्रतिनिधी. तालुका येथे आज 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे बैठककीचे अध्यक्ष , राज्य कार्याध्यक्ष प्रा दशरथ वैजनाथ रोडे तर प्रमुख पाहुणे. स.का. पाटेकर, अजय गोरे, राजकूमार धिवार यांच्या उपस्थितीत नवीन कार्यकारिणी शासकीय विश्रामगृह येथे १-०० वाजता संपन्न झाली.
राष्ट्रीय अध्यक्ष. विजय सुर्यवंशी, राष्ट्रीय उपाध्यक्ष- विजयकुमार वाव्हळ, महाराष्ट्र राज्यध्यक्ष , संतोष जाधव यांनी केज तालुका नवनिर्वाचित कार्यकारिणी जाहीर करण्यात आली त्यांचे अभिनंदन केले आहे. बीड जिल्हास्तरीय राष्ट्रीय उपाध्यक्ष विजयकुमार वाव्हळ यांच्या नियुक्ती पत्र व ओळख पत्र, सन्मान पत्र, गौरव पत्रकार सन्मान , हस्ते वाटप होणार आहे.
प्रा. रोडे यांनी म्हणाले की, देशात व राज्यात राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संघटक, संघटन, विस्तार अधिक वेगाने वाढत आहे. संघाच्या अंतर्गत विविध समित्यांची माहिती दिली. पंचवीस विविध क्षेत्रातील काम करण्यासाठी समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. शैक्षणिक समिती, साहित्यिक समिती, आरोग्य समिती, सांस्कृतिक समिती, अन्याय अत्याचार समिती, कायदेशीर सल्लागार समिती, गाव तेथे ग्रामविकास समिती,
पर्यावरण व प्रदुषण निवारण समिती,महिला उद्योग रोजगार समिती, माहिती अधिकार समिती,रेशन दक्षता समिती,बळीराजा हक्क समिती,ग्रंथालय व कर्मचारी निवारण समिती,लोक कला जतन संस्कृती समिती,अपंग निवारण समिती, अन्य समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. यासर्व विविध समित्यावर देशात व राज्यात कार्यरत आहेत. पाटेकर म्हणले की, पत्रकार , पत्रकारिता वृत्तपत्राचा विस्तार हे अत्यंत महत्त्वाचे कार्य व काम होय. सामाजिक, शैक्षणिक, क्षेत्रात उत्कृष्ट सेवा उपलब्ध करून देण्यासाठी वेळोवेळी जागरूकता पत्रकाराने राहणे गरजेचे आहे. काळाच्या प्रवाहात सामील झाले पाहिजे. कोणतेही संघटन अत्यंत कठीण काम आहे.
केज तालुका कार्यकारिणीच्या बैठकीस मार्गदर्शन प्रमुख पाहुणे मराठवाडा उपाध्यक्ष तथा दैनिक- जय गणनायक , मुख्य संपादक - स.का. पाटेकर , अजय गोरे. बीड जिल्ह्याचे माजी सचिव राजकुमार धिवार यांनी नवनिर्वाचित सभासदांना मार्गदर्शन केले .ज्ञतसेच केज तालुका शाखेचे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाची नवीन कार्यकारिणी, पुढील प्रमाणे नवनिर्वाचित अध्यक्ष, रंजित घाडगे , तालुका सचिव अनिल वैराग, तर कार्याध्यक्ष पदी- जयद्रथ गायकवाड, कोषाध्यक्ष लक्ष्मण हजारे, सहसचिव अमोल सावंत , संघटक दिनकर जाधव , हरी जाधव सदस्य , सह कोषाध्यक्ष नवनाथ पौळ उपाध्यक्ष सर्वानुमते घोषणा नवनिर्वाचित सभासदांना केज तालुकास्तरीय सर्वांनचे पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन केले.
stay connected