महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालय 1993 च्या बीएससी बॅचचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

 महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालय 1993 च्या  बीएससी बॅचचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न



श्रीगोंदा वार्ताहर:- महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालय 1993 च्या  बीएससी बॅचचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न झाला.शैक्षणिक क्षेत्र, वैज्ञानिक क्षेत्र, आरोग्य क्षेत्र, प्रशासकीय सेवा, शेती, उद्योजक, अशा सर्व क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सर्व जुने मित्र यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता.याप्रसंगी सोबत शिक्षण घेतलेल्या दिवंगत झालेल्या वर्गमित्र तसेच गुरुजनवर्ग यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री ज्ञानदेव म्हस्के सर व उपस्थित सन्माननीय गुरुजन श्री जगताप सर ,श्री ननवरे सर,  डॉ. श्री एल आर पाटील सर यांच्या हस्ते सरस्वती प्रतिमेचे पूजन आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून दिपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉ. ज्ञानदेव म्हस्के यांनी भूषविले. सर्व वर्ग मित्रांनी मनोगत व्यक्त करताना कॉलेज जीवनातील आठवणी जाग्या केल्या. तीस वर्षानंतर सर्वांना भेटण्याचा योग आला. सर्वांना या प्रसंगी आनंदाश्रू येत होते. तसेच या कार्यक्रमामध्ये 40 वर्गमित्र त्यांच्या सहकुटुंबासह सहभागी झाले होते.आमचे काही मित्र प्रदेशातून तसेच विशाखापट्टणम येथून कार्यक्रमांमध्ये ऑनलाईन सहभागी झाले होते. नामांकित संस्था आईसर पुणे येथे कार्यरत असणारे आमचे मित्र श्री अशोक रुपनर यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनावर आधारित असलेले एक पुस्तक सर्वांना भेट दिले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. म्हस्के सर यांनी शैक्षणिक जीवनातील वाटचालीवर प्रकाश टाकला तसेच आम्हा विद्यार्थ्यांना घडविण्यामध्ये गुरुजनांनी दिलेल्या योगदानामुळे आम्ही विविध पदावर काम करत आहोत अशी भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. तसेच याप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असलेले गुरुवर्य जगताप सर ,ननवरे सर, डॉ. एल. आर. पाटील सर यांनीही मनोगत व्यक्त केले.  कार्यक्रमानंतर सर्वांनी स्नेह भोजनाचा आस्वाद घेतला. कार्यक्रम यशस्वीरित्या  संपन्न होण्यासाठी श्री भगवान वाकडे, मच्छिंद्र पाडळे, आप्पा होले, संजय दातीर, डॉ. शरद गिरमकर, रामदास जगताप, सौ उषा गोंधळी, सौ. मीना डफाळ मॅडम, कैलास घाडगे,  सिद्धेश्वर गोयकर व इतर सर्व मित्रांनी कष्ट घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अविनाश कंदले व श्री दत्तात्रेय भुजबळ यांनी केले तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अण्णा नितनवरे यांनी केले आणि राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.