कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर ,रमेश बैस हे राज्याचे नवे राज्यपाल
अनेक दिवसांपासून विरोधी पक्षांनी राज्यपाल कोश्यारी यांच्या विरोधात आवाज उठवला होता. राज्यपालांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांनी केली होती. अखेर आज कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. आज एकूण 13 नवीन राज्यपालांची नियुक्ती राष्ट्रपती भवनाकडून करण्यात आली आहे.
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल
रमेश बैस हे राज्याचे नवे राज्यपाल म्हणून पदभार स्वीकारणार आहेत.विरोधी पक्षांनी राज्यपाल कोश्यारी यांच्या विरोधात मोठी आंदोलने केली होती. त्यानंतर राज्यपालांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांनी केली होती.
यानंतर भगतसिंह कोश्यारी यांनी राजीनामा दिला होता. हा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. भगतसिंह कोश्यारी यांच्या राजीनामा मंजूर करण्यात आल्याची माहिती राष्ट्रपती भवनाकडून देण्यात आली आहे.
stay connected