आष्टीचे प्रा.अंबादास नेटके यांना राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहिर
******************************
*******************************
आष्टी (प्रतिनिधी)
राष्ट्रीय चर्मकार महासंघ माजलगाव
यांच्यावतीने संत शिरोमणी रविदास
महाराज व कंक्कया महाराज यांच्या
जयंती महोत्सवाचे आयोजन शनिवार
दि. १८ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वा.
वैष्णवी मंगल कार्यालयात करण्यात आले आहे.या कार्यक्रमात संत रविदास पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.
माजी आमदार महोनराव सोळंके यांना (शिक्षण सेवा), केंद्रीय मंत्री यांचे
सचिन ओमप्रकाश शेटे यांना (आरोग्य दुत),उपजिल्हाधिकारी निलंगा सौ.
ज्योतीताई जाधव (समाजभूषण),दामिनी पोलिस पथक पोलिस आयुक्तालय औरंगाबाद सौ.निर्मलाताई निंभोरे यांना
(समाजभूषण),लोकनेते गोपीनाथ मुंडे
सहकारी सुतगिरणी केज चेअरमन विजयप्रकाश ठोंबरे (सहकार),जेष्ठ नेते रा.काँ.पार्टी माजलगाव दयानंदभाऊ
स्वामी (सामाजिक कार्य),जेष्ठपत्रकार माजलगाव उमेशकाका मोगरेकर (आदर्श पत्रकार),ज्यांनी पेट्रोल पंपाची साखळी निर्माण केली असे अनिल खंडागळे ( उद्योजक),आष्टी येथील शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ट सेवा आणि संत रविदास महाराज अभ्यासक प्रा.
अंबादास नेटके (आदर्श शिक्षक) यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ.प्रकश सोळंके हे राहणार आहेत. उद्घाटक म्हणुन छत्रपती सह.साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन मोहन जगताप उपस्थित राहणार आहेत. विशेष उपस्थिती माजी आ.राधाकृष्ण होके पाटील,माजी आ.आर.टी.देशमुख,
आर.सी.एम.प्रदेश अध्यक्ष माधवराव गायकवाड,मराठवाडा उपाध्यक्ष इंजि.एन.डी.शिंदे,भाजप नेते रमेश आडस्कर,बहुजन विकास पार्टी अध्यक्ष बाबुराव पोटभरे,मानवी हक्क अभियान अध्यक्ष,पं.जवाहरलाल नेहरु विद्यापीठ दिल्लीचे प्रा.मीलींद आव्हाड, जिल्हा अरोग्य चिकीत्सक सुरेश साबळे,
राज्य उपाध्यक्ष राहुल सांळुके,शिवाजी रांजवण,आप्पसाहेब जाधव शिवसेना जिल्हाप्रमुख यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार
आहे .
या कार्यक्रमास मोठ्या संख्येने
उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्रीय
चर्मकार महासंघ बीड जिल्हाध्यक्ष
नानासाहेब घोडके,युवा जिल्हाध्यक्ष
राजेश जाधव, जयंती अध्यक्ष अॕड.
गणेश गवळी,उपाध्यक्ष अशोक वाडेकर, सचिन रमेश जगताप ,नेते सत्यनारायण भाजपा ऊनवणे,माजी उपनगराध्यक्ष सुनील खंडागळे. रा.काँ.पार्टीचे सरचिटणीस सुनील शिंदे,अशोक वाघमारे
,राधाकीसन भालशंकर,योगेश शिंदे, तालुकाध्यक्ष सुभाष कांबळे,शहराध्यक्ष विजय नरहीर,प्रसाद वाघमोडे,संतोष जाधव,अश्विन खंडागळे,आर्जून पोहेकर, संतोष खंडागळे यांनी केले आहे.
stay connected