लोणी गावातील विकास कामांची सुरुवात

 🌹🌹 लोणी गावातील विकास कामांची सुरुवात🌹🌹










लोणी गावामध्ये सांडपाणी व्यवस्थापन करण्यासाठी आज दिनांक 12 रोजी पाच लक्ष रुपये किमतीच्या ड्रेनेज पाईपलाईन चे उद्घाटन व प्रत्यक्ष कामास लगेचच सुरुवात करण्यात आली. पहिल्या टप्प्यामध्ये निम्म्या गावातील सांडपाणी व ड्रेनेज लाईन पूर्णत्वास नेण्याचा ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा प्रयत्न.

लोणी ग्रामस्थांना निवडणुकीमध्ये गावाचा विकास आणि स्वच्छ ,समृद्ध गाव हा शब्द  माननीय सरपंच संजय रक्ताटे सर यांनी दिला होता. गावामध्ये ड्रेनेजची व्यवस्था नसल्यामुळे मागील पंधरा वर्षांपूर्वी खोदलेले शोषखड्डे आता निकामी झाले होते. त्यामुळे सर्व सांडपाणी रस्त्यावर येत होते. नागरिकांची अडचण समजून प्रथमतः गावातील सांडपाण्याचे व्यवस्थापन व निचरा करण्यासाठी ड्रेनेज लाईन टाकण्याचा एकमुखी निर्णय नूतन पदाधिकाऱ्यांनी घेतला व त्या कामाची प्रत्यक्ष सुरुवात आज सर्व ग्रामपंचायत पदाधिकारी व सरपंच ,उपसरपंच यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आली.

याप्रसंगी सरपंच श्री. संजय रक्ताटे सर, माजी सरपंच बाजीराव वाळके, राजेंद्र आबा वाळके, भाऊसाहेब सासवडे, बाबासाहेब सासवडे , अशोक बापूराव सासवडे ,भगवान भाऊ रक्ताटे ,मारुती वाळके खोरी,पांडुरंग शिंदे, उत्तम काका वाळके, आयुब सय्यद ,लालासाहेब गोरे, विश्वनाथ सावरे, सोमनाथ मेजर बेल्हेकर, मेजर  बाळु शिंदे, सुभाष वाळके, भाना भाऊ आमदार, मोहब्बत बेग, खंडू सासवडे, उपसरपंच रामदास देवकर,सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि 

ग्रामस्थ युवक मित्र बहुसंख्येने उपस्थित होते.

पुढील पाच वर्षांमध्ये गावातील सर्व समस्यांचे निराकरण करून पुन्हा एकदा आदर्श गाव.. समृद्ध गाव म्हणून लोणीला मोठ्या उंचीवर आणण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे श्री. संजय रक्ताटे सर यांनी सांगितले.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.