धामणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र असून अडचण नसून खोळंबा वरिष्ठांचे पाठबळ असल्याने डॉक्टरांची मुजोरगिरी

 धामणगाव येथील प्राथमिक   आरोग्य केंद्र असून अडचण नसून खोळंबा
वरिष्ठांचे पाठबळ असल्याने डॉक्टरांची मुजोरगिरी




आष्टी प्रतिनिधी

: प्राथमिक आरोग्य केंद्र, धामणगाव  येथील आरोग्य केंद्रामध्ये  औषधाचा साठा उपलब्ध नसल्यामुळे.  सध्या हे रुग्णालय रामभरोसे चालत आहे. यामुळे रुग्णांची मोठी हेळसांड होत आहे. या ग्रामीण रुग्णालयात बोरडवाडी वंजारवाडी हाकेवाडी बिरंगळवाडी राळसांगवी लाटेवाडी महाजनवाडी,  गावचे रुग्ण तपासणीसाठी येतात. सध्या शेतीचा हंगाम सुरू आहे. 


गावागावात ताप, मलेरिया, डेंग्यू या आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत आहेत. रुग्ण तपासणी करण्याकरिता येतात. परंतु इंजेक्शन कपसिरप.  ॲसीलॉक .डोळ्याच्या बॉटल. कुत्रा चावल्यावर जे इंजेक्शन देतात ते इंजेक्शन अशा अनेक प्रकारच्या औषधाचा तुटवडा गेल्या दीड ते दोन महिन्यापासून आहे.औषधे उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांना आल्या पावली परत खासगी दवाखान्यात धाव घ्यावी लागते. याचा गरिबांना आर्थिक भुर्दंड बसतो.


कधी वैद्यकीय अधिकारी नाही, तर कधी कर्मचारी नाही, कधी औषधांचा तुटवडा.हे चित्र आहे तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय आष्टी अंतर्गत येणाऱ्या धामणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये दिसत आहे.धामणगाव सह परिसरातील नागरिकांना उत्तम दर्जाची आरोग्यसेवा देण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून  येथील आरोग्य केंद्रात बाह्य रुग्ण विभागाची स्थापना करण्यात आली. सुरुवातीपासून आजपर्यंत या आरोग्य केंद्रात अनेक समस्या आहेत. त्या समस्यांना तोंड देत धामणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र कसेबसे सलाईनवर चालत आहे. धामणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जिल्हा आरोग्य अधिकारी यांचेही दुर्लक्ष होत आहे. तालुका अधिकारी हे सुद्धा लक्ष देत नाहीत. डॉ अनिल अरबे सर आल्यापासून मोडकळीस आलेला दवाखाना चांगल्या स्थितीत रुग्णांच्या सेवेत चालू केला आहे. तालुका अधिकारी शिंदे मॅडम यांच्याकडे वारंवार तक्रार देऊनही यामध्ये त्या लक्ष देत नाहीत. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे जातीने लक्ष देऊन औषधाचा साठा लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावा व बेजबाबदार पणा करणाऱ्या अधिकाऱ्यावर योग्य कार्यवाही करून गोरगरीब, कष्टकरी, शेतमजूर जनतेला न्याय देण्यात यावा, अशी मागणी मा सुरेश कांबळे यांनी केली आहे अन्यथा प्राथमिक आरोग्य केंद्र, धामणगाव येथे टाळा ठोको आंदोलन करण्यात येईल, असा ईशारा जनहित लोकशाही पार्टी बीड जिल्हाध्यक्ष सुरेश कांबळे यांनी दिला आहे .









टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.