खा. रजनी पाटील यांच्यावर कारवाई म्हणजे लोकशाहीचा आवाज दाबण्याचे षडयंत्र :- प्रवीण खोडसे
केज :- प्रतिनिधी
पंतप्रधानांच्या भाषणादरम्यान विरोधकांचा गोंधळ चित्रित केल्याप्रकरणी काँग्रेसच्या राज्यसभेतील खासदार रजनी पाटील यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्यांचे सभागृहातून उर्वरित अधिवेशनासाठी निलंबन करण्यात आले आहे.
काँग्रेसच्या राज्यसभा खासदार रजनी पाटील यांना राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांनी निलंबित केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणादरम्यान विरोधकांचा गोंधळ त्या चित्रित करत होत्या. त्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. पाटील व्हिडीओ चित्रित करत असल्याच्या कृतीवर केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी आक्षेप घेतला होता. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.ही कार्यवाही म्हणजे लोकशाही आवाज दाबण्याचा प्रयत्न असल्याचे मत केज तालुका युवक काँग्रेसचे प्रवीण खोडसे यांनी बोलताना सांगितले.
काल अधिवेशनात राज्यसभेच्या खासदार रजनीताई पाटील यांनी सभागृहात जनेतचे प्रश्नावर आवाज उठवला होता त्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.त्यांना निलंबित करून सुड बुध्दी केली आहे का असा प्रश्न पडतो कारण आजपर्यंत असा वीडियो एकदाच केला आहे काय? या अगोदर कुठल्याही नेत्याचा असा व्हिडिओ झाला नाही का मग आजच असे का?असा सवाल महाराष्टातील जनतेला पडलेला आहे सर्व सामान्य माणसाच्या न्याय हक्कांसाठी लढणारे नेतृत्व म्हणजे खासदार रजनीताई पाटील सतत सभागृहात आपल्या खास शैलीत आवाज उठवून सामान्य माणसाला न्याय मिळवून दिला.त्यांच्या निलंबनाचे सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सभागृहात पोहचणार नाहीत याची खंत वाटत असल्याचे प्रवीण खोडसे यांनी सांगितले आहे.
stay connected