नोकरीची सुवर्ण संधी -राज्याच्या एसटी महामंडळात होणार मोठी भरती , पात्रता फक्त १०वी पास !

 नोकरीची सुवर्ण संधी -राज्याच्या एसटी महामंडळात  होणार मोठी भरती , पात्रता फक्त १०वी पास !




एसटी महामंडळात नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. राज्याच्या एसटी महामंडळात भरती आयोजित करण्यात आली आहे. महामंडळातील धुळे आगारात 110 पदांसाठी भरती निघाली आहे.

www.youtube.com/@Tejwarta

यासाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने मात्र अर्ज करावे लागणार आहेत. आज आपण कोणत्या पदांसाठी भरती निघाली आहे, अर्ज कुठे सादर करायचा, शैक्षणिक अहर्ता, अर्ज करण्याची शेवटची दिनांक यासारख्या महत्त्वाच्या बाबी जाणून घेणार आहोत


एसटी महामंडळातील धुळे आगारात शिकाऊ उमेदवार पदासाठी भरती होणार आहे. एकूण 110 पदे भरली जाणार आहेत.



या पदभरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. विभागीय कार्यालय महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ धुळे या ठिकाणी इच्छुक उमेदवारांना अर्ज करायचे आहेत.

20 फेब्रुवारी 2023 पर्यंत धुळे आगारात निघालेल्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करायचे आहेत.

कोणत्याही मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किमान दहावी उत्तीर्ण आवश्यक राहणार आहे. तसेच आयटीआयचे शिक्षण देखील बंधनकारक राहणार आहे. यासाठी जाहिरात संपूर्ण पाहणे आवश्यक राहणार आहे. 



खुल्या प्रवर्गासाठी पाचशे रुपये आणि मागासवर्गीय प्रवर्गासाठी अडीचशे रुपये इतकी फी अर्जासाठी लागणार आहे.




आवश्यक कागदपत्रे


बायोडेटा, दहावी बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्र, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट, ओळखीचा पुरावा आणि पासपोर्ट साईज चे फोटो या ठिकाणी अर्ज करताना आवश्यक राहणार आहेत.


भरतीचीं जाहिरात कुठे पाहायची

धुळे आगारात निघालेल्या भरतीची जाहिरात पाहण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ भरती 2023 या लिंक वर क्लिक करा. आपण, https://msrtc.maharashtra.gov.in/index.php या एसटी महामंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर भेट देऊनही अधिक माहिती जाणून घेऊ शकता.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.