काझी अब्दुल अजीज सरफराज याची नेत्र दीपक कामगिरी !

 काझी अब्दुल अजीज सरफराज याची नेत्र दीपक कामगिरी !





बीड जिल्ह्याचा सुपुत्र खेळाडू काझी अब्दुल अजीज सरफराज याने नेत्र दीपक कामगिरी करत महाराष्ट्र राज्य ला दोन राष्ट्रीय पदकं मिळवून दिले 

जम्प रोप  फेडरेशन ऑफ इंडिया, महाराष्ट्र राज्य जम्प रोप असोसिएशन, यांच्या संयुक्त विद्यमाने 19 वी ज्युनिअर नॅशनल  चॅम्पियनशीप 18 वी सब ज्युनिअर फेडरेशन कप ३ फेब्रुवारी ते ५ फेब्रवारी २०२३ दरम्यान राष्ट्रीय जम्प रोप स्पर्धा २०२३ चे आयोजन करण्यात आले होते.  समता इंटरनॅशनल स्कूल कोपरगाव येथे आयोजित केलेल्या पंधराव्या जुनियर गट राष्ट्रीय जम्परोप  स्पर्धेमध्ये भारतातील सुमारे 16 पेक्षा जास्त राज्य संघाने भाग घेतला होता यामध्ये बीड जिल्ह्याचा सुपुत्र खेळाडू काझी अब्दुल अजीज सरफराज याने नेत्र दीपक कामगिरी करत महाराष्ट्र राज्य ला दोन राष्ट्रीय पदकं मिळवून दिले. या खेळाडू ने endurance 3 मिनिट या प्रकारात गोल्ड मेडल मिळवले व डबल अंडर या प्रकारात सिल्वर मेडल मिळवले काझी कुटुंबातील त्याचे आजोबा स्वर्गीय काझी मुझफ्फरोद्दीन हे व्हॉलीबॉल चे उत्कृष्ट राष्ट्रीय खेळाडू होते त्याचे वडील हे सुद्धा व्हॉलीबॉल राष्ट्रीय खेळाडू होते या खेळाडू ला पूर्णवाद स्पोर्ट्स अँड प्रमोशन अकॅडमी बीड येथे राष्ट्रीय प्रशिक्षक तथा जम्प रोप असोसिएशनचे जिल्हा सेक्रेटरी श्री विनायक वझे यांनी प्रशिक्षण दिले या  खेळाडू चे जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती देशमुख मॅडम त्याच्या या कामगिरीबद्दल प्रा.काझी सरफराज सर काझी कुटुंब व मित्र परिवार  त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.