आष्टी शहरात शिवजयंतीनिमित्त आठ दिवस कार्यक्रम... ******************************** तालुक्यातील शाळांनी शिवकालीन शस्ञे,ऐतिहासीक वस्तू प्रदर्शनाचा लाभ घ्यावा ----संयोजक

 आष्टी शहरात शिवजयंतीनिमित्त आठ दिवस कार्यक्रम...
********************************
तालुक्यातील शाळांनी शिवकालीन  शस्ञे,ऐतिहासीक वस्तू प्रदर्शनाचा लाभ घ्यावा
----संयोजक

*********************************





*********************************

आष्टी (प्रतिनिधी)

यावर्षीचा शिवजयंती महोत्सव उत्साहात पार पडणार असून,आठ दिवस या महोत्सवात विविध कार्यक्रम व उपक्रम होणार असल्याची माहिती आष्टी येथील छञपती शिवाजी महाराज चौक मिञ मंडळ पदाधिकारी यांनी दिली आहे.

आष्टी येथील छञपती शिवाजी महाराज चौक मिञ मंडळाच्या वतीने गुरूवार दि.९ रोजी सकाळी ११ वा.आयोजित करण्यात आलेल्या पञकार परिषदेत पदाधिकारी बोलत होते.

     शिवजंयती महोत्सवाला शनिवार पासून सुरूवात होत असून दि.११ रोजी सायंकाळी ६ वा शिवव्याख्याते प्रा.नितीन बानगुडे पाटील यांचे व्याख्यान,दि.१३ सोमवार रोजी शिवकालीन गोंधळ वाघ्यामुरळी सह,दि.१५ बुधवार रोजी शाहिर तुकाराम काळे यांचा पोवाड्याचा कार्यक्रम तर दि.१६ व १७ फेब्रुवारी रोजी शिवकालीन शस्ञे,ऐतिहासीक वस्तू प्रदर्शन दि.१७ रोजी मर्दानी खेळ तर दि.१९ रोजी सकाळी १० वा.शिवध्वजारोहण तर सांयकाळी विना अध्यक्ष विना पोलिस बंदोबस्तात भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात येणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली.

विशेष आकर्षण दोन दिवस होणाऱ्या शिवकालीन शस्ञे,ऐतिहासीक वस्तू प्रदर्शनाचा 

तालुक्यातील शाळेंनी सहभाग नोंदवावा

शाळेतील विद्यार्थ्यांना छञपती शिवाजी महाराजांनी हातळलेले शस्ञ पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना कोल्हापूर,सातारा या ठिकाणी जावे लागते पण हि संधी आपण आष्टी शहरात उपलब्ध केली असून,दोन दिवस हे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे.हे प्रदर्शन पाहण्यासाठी १८ वर्षापर्यंत मूलांना १० रूपये तर प्रौढ व्यक्तींना ३० हे नाममाञ दर ठेवण्यात आले असल्याचे संयोजकांनी सांगीतले.

विना डिजे,विना अध्यक्ष व विना पोलिस बंदोबस्तात शिवजयंती गेल्या सात वर्षापासून शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती विना डिजे,विना अध्यक्ष व विना पोलिस बंदोबस्तात हि शिवजयंती साजरी करण्यात येते.एवढेच नाही तर शिवजंयतीमध्ये नागरीकांनी दिलेल्या वर्गणीचा व जयंतीसाठी खर्च झालेल्या हिशोबाचा तपशिल ही चौकात जाहीर फलक लावून करण्यात येतो.







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.