*चांद सुलताना हायस्कूल मध्ये १० वी च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात साजरा*
अहमदनगर:-
चांद सुलताना हायस्कूल मध्ये १० वी च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी अध्यक्षीय भाषणात संस्थेचे अध्यक्ष सय्यद अब्दुल मतीन अ. रहीम यांनी "जीवना मध्ये यशस्वी होण्यासाठी स्वयंशिस्त व वेळेचे नियोजन गरजेचे आहे" असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बालभारती चे श्री. खान नवेदुल हक उपस्थित होते यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला व पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या. श्री. सय्यद वहाब उमर यांनी विद्यार्थ्यांना आजच्या युगातील आव्हानांची जणिव करून दिली.या प्रसंगी शिक्षक वर्गांमधून खान फैरोज सरांनी "जीवनात कष्टाचे महत्त्व" ही संकल्पना विद्यार्थ्याना समजावून सांगितली.या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक शेख मोहमद समि सर यांनी " निरोप क्षण नाही ; शुभेच्छाचा सण आहे पाऊल बाहेर पडताना रेंगाळणार मन आहे !" या उक्तीचे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन १० वी च्या विद्यार्थ्यींनी पठाण तस्किन गुलजार व शेख कुलसूम गफ्फार यांनी व आभार बागवान कुदसिया मो. अली यांनी केले.या प्रसंगी शाळेचे उपमुख्यद्यापक तांबोळी ,पर्यवेक्षक नायकवडी शगुफ्ता व शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
stay connected