आष्टी तालुक्यातील कडा ते टाकळी आमिया हा रस्ता बनला मृत्यूचा सापळा.
टाकळी आमिया/अविनाश शिंदे.
आष्टी तालुक्यातील कडा ते टाकळी आमिया हा रस्ता अतिशय खराब झाला आहे.
या रस्त्यावर अतिशय मोठ मोठे खड्डे पडले आहेत कडा ते टाकळी आमिया हा रस्ता मिरजगाव कडे हा रस्ता जात असुन या रस्त्यावर खड्डे पडले असल्यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणात आपघात होत आहे .
हा रस्ता तयार झालेला बरेच वर्षे झाले या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते .
टाकळी आमिया या मार्गे सराटे वडगांव, आनंदवाडी , रूईनालकोल, कानडी बेलगांव व घुमरी पिपरी इत्यादी गांवाचा समावेश आहे हा रस्ता खराब असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर आपघात होत आहेतच परंतु आजारी व्यक्तीना हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी खुप त्रास होत आहे कारण रस्ता खराब असल्यामुळे अनेकांना आपले जीव गमवावे लागतात त्यामुळे हा रस्ता शासनाने दक्षता घेऊन त्वरित दुरुस्त करावा अशी मागणी टाकळी आमिया ग्रामस्थ करत आहे.
stay connected